शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

गळीत हंगामाचे नियोजन आतापासूनच करावे; शरद पवार यांची साखर कारखान्यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 11:55 IST

साखरेचा पुढील गळीत हंगाम विक्रमी ऊस लागवडीमुळे अडचणींचा ठरण्याची शक्यता आहे. पुढील गळीत हंगामाचा कार्यक्रम आत्तापासून कारखान्यांनी आखावा, अशी सूचना माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केली. 

ठळक मुद्देउपाय योजना केल्या नाही तर ऊस हंगाम जूनपर्यंत लांबून साखर उतारा कमी मिळेल : पवार 'देशात विक्रमी ऊस उत्पादन झाले आहे, त्यामुळे पुढील हंगामात विक्रमी गळीत'

पुणे : साखरेचा पुढील गळीत हंगाम विक्रमी ऊस लागवडीमुळे अडचणींचा ठरण्याची शक्यता आहे. पुढील गळीत हंगामाचा कार्यक्रम आत्तापासून कारखान्यांनी आखावा, अशी सूचना माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केली. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. पुढच्या वर्षी देशात आणि राज्यात विक्रमी क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे, त्यामुळे पुढील हंगामाचे आत्तापासून नियोजन करावे लागेल. अगदी ज्या कारखाना क्षेत्रात ऊस कमी असेल त्यांनी अधिक ऊस असणाऱ्या भागातील शेतकऱ्यांशी करार केले पाहिजेत. आपल्या देशात थेट ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार होत नाही, ती पद्धत आपल्याकडे तितकीशी अनुकूल देखील नाही, त्यामुळे मोलासीस साठवून ठेवण्याची तजवीज करावी, अशा उपाय योजना केल्या नाही तर ऊस हंगाम जूनपर्यंत लांबून साखर उतारा कमी मिळेल. परिणामी ऊस उत्पादकांना तितकी रक्कम कारखान्यांना देता येणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केलेया वर्षी देशात विक्रमी ऊस उत्पादन झाले आहे, त्यामुळे पुढील हंगामात विक्रमी गळीत होईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPuneपुणे