शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

समाविष्ट ११ गावांमध्ये पायाभूत सुविधांसाठी आराखडा तयार : पालिका आयुक्त विक्रम कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 11:39 IST

जायका प्रकल्पासाठी 'प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट' तयार करणार

ठळक मुद्देपाणी पुरवठा आणि मलनि: स्सारण यावर विशेषतः काम केले जाणार

पुणे : पालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या ११ गावांमध्ये पायाभूत सुविधा देण्यासाठी आराखडा तयार असून पाणी पुरवठा आणि मलनि: स्सारण यावर विशेषतः काम केले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. यासंदर्भात महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांच्यासोबत बैठक झाली असून ह कामे करणे आवश्यक असल्याचे आयुक्त म्हणाले.      पालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ठ झालेल्या अकरा गावांमध्ये पायाभूत सुविधांची कामे करणे आवश्यक आहे. कोरोना काळात विकास कामांना खीळ बसला आहे. आता हळूहळू आवश्यकता पाहून कामे सुरू केली जातील. महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांसोबत बैठकीमध्ये याविषयावर चर्चा झाली असून कोणकोणती कामे करता येतील याचा आढावा घेतला जात असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

-------जायकासाठी 'प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट'महापालिकेच्या मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या नदी सुधार योजना (जायका प्रकल्प) मार्गी लावण्याकरिता 'प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट' स्थापन करण्यात येणार आहे. या युनिटच्या माध्यमातून येत्या ऑक्टोबरपासून काम सुरू करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाची आवश्यकता असून सल्लागार कंपणीलाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

-------शहरातील उद्याने सुरू करण्याबाबत मंगळवारी महापौरांसोबत बैठक घेतली जाणार आहे. उद्यानातील गर्दी टाळणे, सुरक्षित अंतर राखले जाणे, ओपन जिमचा सांभाळून वापर करणे आदींबाबत विचार करावा लागणार आहे. यासंदर्भात अटी व शर्ती तयार करून त्यादृष्टीने परवानगी द्यायची की नाही हे बैठकीत ठरेल असे आयुक्त म्हणाले.

---------

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मैदानाची आवश्यकता आहे. लॉकडाऊनमुळे सध्या मैदाने बंद आहेत. त्यामुळे शहरातील तरुणांची गैरसोय होऊ नये याकरिता पालिकेच्या शाळांमधील मैदाने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या मैदानांवर तरुण पोलीस भरतीची शारीरिक तयारी करु शकतील.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्त