शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेमध्ये स्मार्ट सिटीच्या कार्यालयास जागा द्यावी : काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 20:25 IST

स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कार्यालय सध्या सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमध्ये आहे.

ठळक मुद्देभाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांचा विरोध : महापौरांच्या निर्णयाकडे लक्षस्मार्ट सिटी प्रकल्पाचे कार्यालय पालिकेत आल्यास ते नागरिक, नगरसेवक, प्रशासन यांना सोयीस्कर

पुणे : महापालिकेची नवीन विस्तारीत इमारत तयार झाल्याने पालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कार्यालयास जागा देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कार्यालय सध्या सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमध्ये आहे. ते पालिकेत स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला आहे. मात्र स्मार्ट सिटीचे कार्यालय महापालिकेमध्ये स्थलांतर करण्यास भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांकडून विरोध केला जात आहे. यावरून सभागृह नेते श्रीनाथ भिमाले व आयुक्त सौरभ राव यांच्यात जोरदार वाद झाल्याचीही चर्चा पालिकेत रंगली आहे. यापार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते दिलीप बराटे व काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता महापालिकेत स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कार्यालयास जागा देण्याची मागणी महापौरांकडे केली आहे.  पालिकेच्या ताब्यातील कोणतीही जागा कोणासही देण्याचे प्रयोजन असल्यास मिळकत वाटप नियमावलीच्या नियमांनुसार देणे क्रमप्राप्त आहे. सेनापती बापट रस्त्यावरील  आयसीसी  टॉवरमधील  महापालिकेची जागा स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कार्यालयासाठी भाडयाने दिल्यास मिळकत वाटप नियमावलीनुसार पालिकेला वर्षाला ६ कोटीपेक्षा जास्त भाडे मिळणार आहे. पालिकेची सध्याची आर्थिक स्थिती बघता उत्पन्न्नचे स्त्रोत वाढविणे आवश्यक झाले आहे.  अनेक महत्वाची विकासकामे निधी नसल्याने करता येत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कार्यालय पालिकेत आल्यास ते नागरिक, नगरसेवक, प्रशासन या सगळयांसाठी सोयीचे होणार आहे. त्यामुळे चांगला समन्वय राखता येऊ शकेल असे अरविंद शिंदे यांनी सांगितले............स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कार्यालय पालिकेत स्थलांतर करण्यास एकीकडे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार विरोध केला जात असताना दुसरीकडे विरोधी पक्षांनी स्मार्ट सिटीचे कार्यालय पालिकेतच हवे अशी जोरदार मागणी लावून धरली आहे. त्यामुळे महापौर मुक्ता टिळक यांच्याकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटी