शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसांसह दोघे जेरबंद; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची वाघोलीत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 11:42 IST

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून वाघोली, बाजारमैदान चौक (ता. हवेली) येथून रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार राजेंद्र माणिक राठोड व धोंडिभाऊ महादू जाधव यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून एकूण ४ गावठी पिस्तूल व १० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देवाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी देण्यात आले लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात

पुणे : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून वाघोली, बाजारमैदान चौक (ता. हवेली) येथून रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार राजेंद्र माणिक राठोड (वय ३२, रा. वाघोली, मूळ रा. निमगाव मायंबा, ता. शिरूर कासार, जि. बीड)  व धोंडिभाऊ महादू जाधव (वय २५, रा.निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून एकूण ४ गावठी पिस्तूल व १० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.पुणे जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी स्वतंत्र पथकाची नेमणूक करून गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेले सहा. पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, सहा. फौजदार दत्तात्रय गिरमकर, महेश गायकवाड, निलेश कदम, पोपट गायकवाड, राजू मोमीन, दत्तात्रय जगताप, मोरेश्वर इनामदार, रवी शिनगारे, विजय जांभळे यांच्या पथकास बुधवारी (दि. २०) सायंकाळच्या सुमारास वाघोली, बाजार मैदान चौक, श्रीहरी मिसळ हॉटेलचे समोर शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मारामारीच्या गुन्ह्यातील फरारी असलेला व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार राजेंद्र उर्फ राजा राठोड व त्याचा साथीदार  धोंडिभाऊ जाधव असे दोघेजण गावठी पिस्तूलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी साध्या वेशात सापळा लावून दोघांनाही शिताफीने ताब्यात घेवून त्यांच्याकडून बेकायदा व बिगरपरवाना मिळून आलेले एकूण ४ गावठी बनावटीचे पिस्तूल व १० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. राजेंद्र राठोड याचा निघोज परिसरात वाळूचा व्यवसाय असून त्याने यापूर्वी गंगापूर (जि. औरंगाबाद) तसेच पुणे जिल्ह्यातील दौंड, शिरूर येथेही वाळू व्यवसाय केल्याने तेथील वाळू माफिया व गुन्हेगारांशी त्याचे संबंध आहेत. काही दिवसांपूर्वीच पारनेर येथील तहसीलदार यांच्यावर वाळू माफियांनी केलेल्या हल्ल्यामुळे महसूल विभागाने वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविल्यामुळे तो वाघोली येथे वास्तव्यास येवून हॉटेल व्यवसाय सुरू करणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. तसेच राजेंद्र राठोड हा सुमारे एक वर्षापासून शिरूर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मारामारीच्या गुन्ह्यांमध्येही फरार होता.दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले असून अधिक तपास लोणीकंद पोलीस स्टेशन हे करीत आहेत. 

टॅग्स :wagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसPuneपुणेAhmednagarअहमदनगरBeedबीड