पिंपरी : संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण पिंपरी-चिंचवडकरांना अनुभवण्याची दोन वेळा संधी मिळाली आहे. पुढील वर्षी अधिक मास आणि तिथीत वाढ होणार असल्यामुळे पुन्हा एकदा गोल रिंगण होण्याची शक्यता आहे. त्याची योग्य तयारी व्हावी, अशी अपेक्षा देहू संस्थानकडून बैठकीत व्यक्त करण्यात आली. उद्योगनगरीत पिंपरीतील एच. ए. कंपनीच्या मैदानावर दोन वेळा रिंगण झाले आहे. या रिंगणाचा अनुभव शहरवासीयांनी घेतला होता. वारकरी आणि भाविकांना यंदापासून प्लॅस्टिकचा वापर करू नये, अशा लेखी सूचना देहू संस्थानकडून दिंडीचालकांना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)देहूत आज बैठकपालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी मंगळवारी देहू ग्रामपंचायत येथेही बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस देवस्थान प्रतिनिधी, मावळ तालुका प्रशासन, पाणीपुरवठा, आरोग्य, महावितरण विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पुढील वर्षी होणार पिंपरीमध्ये रिंगण
By admin | Updated: May 24, 2016 05:54 IST