शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
6
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
7
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
8
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
9
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
10
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
11
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
12
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
13
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
14
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
15
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
16
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
17
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
18
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
19
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
20
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीपेंढारचा विराट कोेहली!; अरे, यह तो हमशकल है, कोहलीनेही दिली पावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 18:18 IST

पुणे जिल्ह्यातील पिंपरीपेंढारच्या ‘विराट’चीही सुरू आहे. क्रिकेट हे त्याचे पॅशन नसले तरी शेतात राबणारा हा तरुण सध्या सेम टू सेम विराटसारखा दिसत असल्याने चांगलाच प्रसिद्धीस आला आहे.

ठळक मुद्देसिद्धेशचे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले असून शेती व जोडधंदा म्हणून करतो पोल्ट्री व शेळीपालन सिद्धेशने शेतीमध्ये व गावासाठी काम करून स्वत:चे नाव कमवावे, वंदना जाधव यांची अपेक्षा

गोकुळ कुरकुटेआळेफाटा : जगात एका चेहऱ्याची सात माणसं असतात, असे म्हणतात. कुर्डुवाडीच्या राजेश खन्नाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे, तशीच पुणे जिल्ह्यातील पिंपरीपेंढारच्या ‘विराट’चीही सुरू आहे. क्रिकेट हे त्याचे पॅशन नसले तरी शेतात राबणारा हा तरुण सध्या सेम टू सेम विराटसारखा दिसत असल्याने चांगलाच प्रसिद्धीस आला आहे. स्वत: विराट कोहलीनेही त्याला ‘अरे, ये तो मेरा हमशकल है,’ अशी पावती दिली आहे. सिद्धेश जाधव असे त्याचे नाव. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार त्याचे छोटेसे गाव. तो पदवीधर असून शेतात राबणारा सिद्धेशचे क्रिकेट हे पॅशन नसले तरी त्याची त्याला लहानपणापासूनच आवड आहे. बारावीपर्यंत त्याला तो विराटसारखा दिसतो, याची ओळख झाली नव्हती. २०१४ या वर्षी अण्णासाहेब वाघिरे कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत असताना त्याची पहिल्यांदा ओळख एका मुलीनेच करून दिली. त्या वेळी विराट कोहलीची एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यात त्याचा डुप्लिकेटही दाखवला होता. या काळात ही जाहिरात क्रिकेटप्रेमी संजीवनी शिंदे या मुलीने पाहिली आणि तिने सिद्धेशला अरे, तू तर विराटसारखा दिसतोस, असे सांगितले. तेव्हा खरे त्याला तो विराटसारखा दिसतो, याची ओळख झाली आणि हळूहळू तो विराट नावानेच तालुक्यात प्रसिद्ध होऊ लागला.

सिद्धेशने त्याची लाईफस्टाईलही विराटसारखी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तो सकाळी उठला, की फिटनेसला प्राधान्य देतो. विराट त्याच्या चेहऱ्याचा लुक जसा बदलतो, तसा तोही बदलण्याचा प्रयत्न करतो. सिद्धेशचे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले असून शेती व जोडधंदा म्हणून पोल्ट्री व शेळीपालन तो करतो. 

क्रिकेट त्याचे पॅशन नसले तरी त्याची लहानपणापासूनची आवड आहे. विराटच्या इनिंग तो न चुकवता पाहतो. तेथील राणेश्वर स्पोर्ट्स क्लबकडून तो सध्या स्थानिक क्रिकेट खेळत आहे. तो मैैदानावर असला, की विराट विराटची गुंजही मैदानात असते. पिंपरी-चिंचवड येथे राहणारे व मूळ पिंपरीपेंढार येथील रोहित खर्गे यांनी खरं तर या ‘सेम टू सेम’ विराटला सोशल मीडियावर आणलं. विराटबरोबर भेटीचा फोटो त्यांनी फेसबुकवर टाकल्यानंतर जास्त प्रसिद्धीच्या झोतात आल्याचे सिद्धेश सांगतो. विराट कोहली देशासाठी खेळतो, तर विराटसारखीच हमशकल असणारा माझा सिद्धेशने शेतीमध्ये व गावासाठी काम करून स्वत:चे नाव कमवावे, अशी अपेक्षा सिद्धेशची आई वंदना जाधव यांनी व्यक्त केली. 

आता नावच विराट ठेवणारअलीकडे विराट नाव इतके कानावर पडते, की स्वत:चे नावच बदलून विराट असे ठेवणार असल्याचे सिद्धेशने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

यह तो मेरा हमशकल है!सिद्धेशचे विराट कोहलीला भेटण्याचे स्वप्न होते. त्याचे ते स्वप्न हॉटेल ओबेरायमध्ये गावातीलच सुरक्षा अधिकारी म्हणून काम करणाऱ्या भूषण तपासे यांनी पूर्ण केले. १७ डिसेंबर २०१६ रोजी भारत- इंग्लंड कसोटी सामन्यादरम्यान हॉटेलमध्ये तपासे यांनी सिद्धेशची विराटशी भेट घडवून आणली. सिद्धेश विराटला भेटण्यासाठी गेला असता, त्याला पाहून, ये तो मेरा हमशकल है! असे म्हटल्याने सिद्धेशला सेम टू सेम असल्याची खरी पोहोचपावती मिळाल्याचे सिद्धेश सांगतो. या वेळी विराटने त्याची आस्थापूर्वक विचारपूस केली व ‘क्रिकेट खेलता है क्या’ असे विचारले. 

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीPuneपुणे