शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतील ठेकेदार पुण्यातही ठरला अपात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 06:42 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेने अपात्र ठरवलेल्या एका कंपनीला पुणे महापालिकेतही कामासाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला.

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेने अपात्र ठरवलेल्या एका कंपनीला पुणे महापालिकेतही कामासाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला. जलशुद्धीकरण केंद्राचे काम ही कंपनी करत असून त्यांना काम देण्याऐेवजी फेरनिविदा काढावी किंवा दुसºया क्रमाकांची निविदा खुली करावी असे दोन पर्याय नगरविकास विभागाने महापालिका प्रशासनाला दिले होते.स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम करणाºया एका कंपनीला तेथील प्रशासनाने अपात्र ठरवले. त्यांचे काम बंद केले. तसेच त्यांना काळ्या यादीत टाकले. त्याच कंपनीने अशाच प्रकारच्या कामाची पुणे महापालिकेची निविदा दाखल केली होती. त्यासंबधीचा निर्णय मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत होणार होता. मोहोळ यांनीसांगितले की नगरविकास विभागाने पत्र लिहून स्थायी समितीसाठी दोन पर्याय दिले होते व या कंपनीची निविदा रद्द करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे दुसºया क्रमाकांची निविदा खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कचरा वाहतूक करणाºया वाहनांसाठी चालक देण्याचा ठेका प्रशासनाने जाहीर केला होता. ८ कोटी ५० लाख रूपयांच्या या ठेक्यासाठी आलेली एक निविदाही रद्द करण्याचा निर्णय स्थायीसमितीत झाला. या निविदेविषयी काही चर्चा होत होती, त्याची तपासणी केली असता त्यात तथ्य आढळले म्हणून निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्याने प्रक्रिया होत नाही तोपर्यंत जुन्याच ठेकेदारामार्फत चालक घेण्याचेही ठरवण्यात आले अशी माहिती मोहोळ यांनी दिली.भामा आसखेड योजनेसाठी पाणी उचलून देणार नाही असे पत्र पाटबंधारे विभागाने महापालिकेला दिले होते. प्रशासनाने ते समोर आणले नाही. दर तीन महिन्यांनी यासाठीच्या परवान्याचे नूतनीकरण करून घ्यावे लागते. सध्या योजनेचे काम सुरू आहे. त्यामुळे पाणी उचलले जात नाही. तरीही हे नूतनीकरण त्वरित करून घेण्याची सुचना प्रशासनाला दिली असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले.मुंबई महापालिकेप्रमाणेच ६०० चौरस फुट घरे असलेल्यांना घरपट्टी माफ करावी असा प्रस्ताव शिवसेनेच्या सदस्यांनी दिला होता, तो प्रशासनाकडे अभिप्रायासाठी आला होता.प्रशासनाने असे करता येणार नाही व मुंबई महापालिकेतही असा काही निर्णय झालेला नाही असा स्पष्ट अभिप्राय दिला होता, तो मान्य करण्यात आला असे मोहोळ म्हणाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका