शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी २ हजार २६५ नवे कोरोनाबाधित, तर २ हजार २७ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 20:10 IST

शहरातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ७२ हजार ६७९

ठळक मुद्देदिवसभरात झाले एकूण ८ हजार ३७० जणांचे लसीकरण

पिंपरी: कोरोनाचा आलेख कालपेक्षा दोनशेंनी कमी झाला आहे. दिवसभरात २ हजार २६५ कोरोनाबाधित आढळले असून २ हजार २७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४९जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आठ हजार जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत दोन लाख रुग्णांचा टप्पा गाठला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. काल २ हजार ४०० वर आलेली रुग्णसंख्या दोनशेंनी कमी झाली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ९ हजार ५८३  जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी ६ हजार ८०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ८ हजार ६६२ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ८ हजार २७९ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज ९ हजार ३१० जणांना डिस्चार्ज दिला आहे.

कोरोनामुक्त वाढले दोनशेंनी

कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दोनशेंनी वाढली आहे. आज बाधित रुग्णांपेक्षा दोनशे जण कमीने कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ७२ हजार ६७९ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ६६७ वर गेली आहे.४९ जणांचा मृत्यू

कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या कालच्या एवढीच आहे. शहरातील ५९ आणि शहराबाहेरील ३५ अशा एकूण ९४ जणांचा बळी घेतला आहे. त्यात तरुण आणि महिलांची, ज्येष्ठांची संख्या वाढत आहे.  त्यामुळे मृतांची संख्या २ हजार ६६९ वर पोहोचली आहे.  लसीकरणाचा वेग कमी

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग कमी झाला आहे. महापालिकेच्या ६४ आणि खासगी २२ अशा एकूण ८६ लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू आहे. महापालिकेतील केंद्रावर ७ हजार ७७३ तर खासगी रुग्णालयात ८९७  अशा एकूण ८ हजार ३७० जणांचे लसीकरण करण्यात आले तर ४५ वर्षांवरील ६ हजार ९०४  जणांना लस देण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस