शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 16:22 IST

पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर दोन वर्षांत शहराला लाभलेले ते तिसरे पोलीस आयुक्त आहेत..

ठळक मुद्देसंदीप बिष्णोई हे 'कॅट'मध्ये जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम

पिंपरी : शहराचे नवे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी (दि. ५) दुपारी संदीप बिष्णोई यांच्याकडून पदभार स्वीकारला. पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर दोन वर्षांत शहराला लाभलेले ते तिसरे पोलीस आयुक्त आहेत. आपण कॅटमध्ये जाणार नसून, शासन देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचे संदीप बिष्णोई यांनी या वेळी सांगितले. 

औद्योगिक पट्ट्यातील गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. आर. के. पद्मनाभन पहिले तर दुसरे पोलीस आयुक्त म्हणून संदीप बिष्णोई यांनी कमी मनुष्यबळात आयुक्तालयाचा गाडा हाकला. शहराचे तिसरे आयुक्त म्हणून कृष्ण प्रकाश यांची २ सप्टेंबर रोजी नियुक्ती झाली. मात्र मुदतपूर्व बदली झाल्याने बिष्णोई कॅटमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यात कृष्ण प्रकाश यांनी लागलीच पदभार न घेतल्याने या चर्चेने अधिक जोर धरला. मात्र कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी आयुक्तालयात हजर होत बिष्णोई यांच्याकडून पदभार स्वीकारला.  

कॅटमध्ये जाण्याच्या चर्चेला पूर्णविरामसंदीप बिष्णोई यांची गेल्या वर्षी अर्थात २० सप्टेंबर २०१९ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २१ सप्टेंबर रोजी त्यांनी आर. के. पद्मनाभन यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. एक वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वीच बिष्णोई यांची बदली करण्यात आली. मुदतपूर्व बदली झाली म्हणून, बिष्णोई केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकीकरणकडे (कॅट) धाव घेणार असल्याची चर्चा होती. तसेच त्याबाबतचा सही नसलेला एक ‘ड्राफ्ट’ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आपण कॅटकडे जाणार नसून, शासन देईल ती जबाबदारी सांभाळणार आहोत, असे बिष्णोई यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

मुंबईत पोस्टिंगची शक्यतापिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी नियुक्त होण्यापूर्वी संदीप बिष्णोई हे मुंबई येथे वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक होते. मुंबई येथे कुटुंबिय असून, तेथे काम करण्यास आवडेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे त्यांची मुंबई येथे महत्त्वाच्या पदावर नियुक्ती होऊन मोठी जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली जाऊ शकते

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस