शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Variant: पिंपरी चिंचवडमध्ये आणखी चौघांना ओमायक्रॉनची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 21:10 IST

शहरातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २२ वर पोहोचली असून १३ जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागले असून जपान, बँकॉक आणि दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघांना तसेच त्यांच्या संपर्कातील एकास ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्यामुळे शहरातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २२ वर पोहोचली आहे. तर १३ जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी शहरात आलेल्या तीन जणांचा ओमायक्रॉन अहवाल डिसेंबर महिन्यांच्या पहिल्या आठवडयात पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर शहरात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आलेले आहेत.

मागील महिन्यांपासून परदेशातून आलेल्या प्रवाशांची  तपासणी ३१ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या संपर्कातील ३६ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. या रुग्णांच्या घशातील द्रवाची नमुने राष्ट्रीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यावरून शहरांमध्ये चार आठवडयात २२ रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळले आहेत. परदेशातून आलेल्या १३ आणि त्यांच्या संपर्कातील ९ जणांना ओमायक्रॉनची लागण झालेली आहे.

लहान मुलांचाही समावेश

बुधवारी आढळलेल्या चार रुग्णांमध्ये दोन महिला, एक पुरुष आणि एक लहान  मुलाचा समावेश आहे. यातील एक जण बँकॉकहून आलेला आहे. तर एक जण जपानमधून तर एक जण दक्षिण आफ्रिकेतून आलेला आहे. तसेच रँडम तपासणीमध्ये एक जणांचा अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आलेला आहे. सर्व रुग्ण भोसरीतील महापालिका रूग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांनी काही लक्षणे आढळल्यास तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय विभागाचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली. 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या