शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

आळंदी: कार्तिकी वारी निमित्ताने अलंकापुरीत हरिनामाचा गजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 15:31 IST

माऊलींच्या मंदिर महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाच्या मुख्य कार्यक्रमाला सकाळी नऊच्या सुमारास भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली

आळंदी: टाळ - मृदंगाच्या निनादात आणि पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारात शनिवारी (दि.२७) सकाळी नऊला मंदिराच्या मुख्य महाद्वारातील गुरु हैबतबाबांच्या पायरीपूजनाने माऊलींच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्यास अर्थातच कार्तिकी यात्रेस सुरुवात करण्यात आली. माऊलींच्या मंदिर महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाच्या मुख्य कार्यक्रमाला सकाळी नऊच्या सुमारास भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली.

माऊलींचे पुजारी श्रीनिवास कुलकर्णी, अमोल गांधी व श्रीरंग तुर्की यांनी विधिवत पौराहित्य केले. गुरू हैबतबाबांच्या पायरीला दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तराचे शिंपण, हारतुरे, पेढे अर्पण करत पालखी सोहळा मालक बाळासाहेब पवार आणि कुटूंबियांच्या हस्ते पायरीचे पूजन करण्यात आले. महाद्वारातील विधिवत पूजेनंतर माउलींची आरती आणि पसायदान घेण्यात आले. त्यांनतर मंदिराला प्रदक्षिणा घालून माऊली मंदीरातील गुरू हैबतबाबांच्या ओवरीत आरती घेण्यात आली.

याप्रसंगी प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अभय टिळक, विश्वस्त ॲड. विकास ढगे - पाटील, प्रांतधिकारी विक्रांत चव्हाण, मुख्याधिकारी अंकुश जाधव, वरीष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, थोरल्या पादुका देवस्थानचे अध्यक्ष ऍड. विष्णू तापकीर, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, सचिव अजित वडगावकर, माजी नगरसेवक डी.डी. भोसले, अध्यक्ष माऊली गुळुंजकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सायंकाळी ह.भ.प. योगिराज ठाकूर आणि सायंकाळी ९ ते ११ बाबासाहेब आजरेकर यांची किर्तन सेवा झाली. गुरू हैबतबाबा पायरीसमोर रात्री १० ते पहाटे ४ पर्यंत ह.भ.प. वासकर महाराज, ह.भ.प. मारुतीबुवा कराडकर आणि ह.भ.प. हैबतबाबा आरफाळकर यांच्या वतीने जागर पार पडला. हैबतबाबा वंशज्यांच्या वतीने विश्वस्त मंडळ आणि माऊलींच्या मानकऱ्यांना नारळप्रसाद देण्यात आला. दरम्यान आळंदी शहरात भाविकांची गर्दी वाढत असून मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सायंकाळी पंढरीहून पायी चालत आलेल्या संतांच्या दिंड्यांनी आळंदीत प्रवेश केला. 

  • पहाटे विधिवत दुधारती व महापूजा
  • महाद्वारात आकर्षक फुलांची सजावट. 
  • श्री. संत ज्ञानेश्वर महाराज, श्री. गुरु हैबतबाबा यांच्या आकर्षक फुलांनी सजवल्या प्रतिमा.
  • वारकऱ्यांच्या उपस्थितीत हरिनामाचा गजर
टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAlandiआळंदीspiritualअध्यात्मिक