शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विनाचालक बस चालविण्याचा पीएमपीचा ‘पराक्रम’, पिंपळे गुरवमधील थरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 21:34 IST

विना चालक बस रस्त्यावर धावण्याचे तंत्रज्ञान विकसीत होईल तेव्हा होईल मात्र, पीएमपीएमएलने हा  ‘पराक्रम’ करुन दाखवला आहे. पिंपळे गुरव येथील बस स्थानकामध्ये उभी असलेली एक  बस चक्क विना चालक सुरु झाली आणि 100 मीटर पुढे गेली.

पुणे, दि. 12 - विना चालक बस रस्त्यावर धावण्याचे तंत्रज्ञान विकसित होईल तेव्हा होईल मात्र, पीएमपीएमएलने हा  ‘पराक्रम’ करुन दाखवला आहे. पिंपळे गुरव येथील बस स्थानकामध्ये उभी असलेली एक  बस चक्क विना चालक सुरु झाली आणि 100 मीटर पुढे गेली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी अथवा कोणतीही जिवीतहानी हानी झाली नाही, मात्र, रस्त्यावरील दुचाकी आणि एका गॅरेजचे मात्र नुकसान झाले आहे.  ही घटना सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास पिंपळे-गुरव बस स्थानकामध्ये घडली. तसेच, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस मार्केटयार्डवरुन पिंपळे-गुरव बस स्थानकामध्ये आली होती. चालक आणि वाहक फेरीची नोंद करण्यासाठी आगार कक्षामध्ये गेले होते. बसच्या बॅटरीमध्ये बिघाड असल्याने चालकाने बसचे इंजीन सुरुच ठेवलेले होते. थोडा वेळ जागेवर स्थिर उभी असलेली बस अचानक पुढे जाऊ लागली. त्यावेळी बस स्थानकामध्ये बस जात येत होत्या. समोरील रस्त्यावरुन पादचारी आणि वाहनांची वर्दळही सुरु होती. ही बस तशीच पुढे रस्त्यावर गेली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींना धडक देत बस समोरच्या बाजूला असलेल्या एका गॅरेजला जाऊन धडकली. गॅरेजला धडकलेली बस थांबल्यावर हा सर्व प्रकार लक्षात आला. दरम्यान, विनाचालक जात असलेल्या बसमुळे अनेकांच्या हृदयात धडकी भरली. बेजबाबदारपणे बस सुरु ठेवून हलगर्जीपणा दाखविल्याप्रकरणी संबंधित चालक व वाहकावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :Puneपुणे