शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

डुक्कर मुक्त शहर मोहिमेच्या घोषणेचा उडाला फार्स 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 21:07 IST

महापालिका आयुक्तांनी शहर डुक्कर मुक्त करण्यासाठी १० सप्टेंबरपासून खास मोहिम हाती घेतली. पण दोनच दिवसांत ही मोहिम बंद पडली.

ठळक मुद्देसर्वसाधारण सभेत आंदोलन करुन सदस्यांकडून प्रशासनाचा निषेधराष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी प्रतिकात्मक डुकरांसह सभागृहात प्रवेशस्वाईन फ्लू रोखण्यासाठी वेळीच उपाय-योजना करा

पुणे: शहरात भटक्या डुकरांचा प्रचंड उपद्रव वाढला असून, पुणेकर त्रस्त आहेत. महापालिका आयुक्तांनी शहर डुक्कर मुक्त करण्यासाठी १० सप्टेंबर पासून खास मोहिम हाती घेतली, पण दोनच दिवसांत ही मोहिम बंद पडली. त्यामुळे डुक्कर मुक्त मोहिम फार्स ठरली आहे. डुक्कर पकडण्यासाठी लाखो रुपयांचा ठेका दिला असताना महापालिकेच्या कोणताही अनुभव नसलेल्या अप्रशिक्षित कर्मचा-यांना काम लावले आहे. याबाबत शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी डुकरांची प्रतिकृती आणून घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला.  महापालिकेची सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर लगेचच डुक्कर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी प्रतिकात्मक डुकरांसह सभागृहात प्रवेश केला. शहर डुक्कर मुक्त झालेच पाहिजे, ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे अशा जोरदार घोषणा दिल्या. महापालिका प्रशासनाला शहारातील भटकी कुत्री आणि डुक्कर पकडण्यात यश मिळत नाही.  महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी १० सप्टेंबरपासून शहर डुक्कर मुक्त करण्यासाठी कारवाई मोहिम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्या घोषणेचे पुढे काय झाले? वराह पालन करणारे लोक व्यावसाय करतात, त्यांच्या व्यावसायाचा त्रास नागरिकांनी का सहन करायचा,हे शहर डुकरांचे शहर म्हणून ओळखले जाण्याची वाट प्रशासन पहात आहे की काय, असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. वराह पालन करणाऱ्या व्यावसायिकांचे शहराबाहेर पुर्नवसन त्वरीत करावे. जे व्यावसायिक शहराबाहेर स्थलांतर करणार नाहीत, त्यांचे स्थलांतर बळजबरीने करावे, अशी मागणीही नगरसेवकांनी केली. यावेळी नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, गफुर पठाण, आबा तुपे, प्रकाश कदम, अ‍ॅड. अविनाश साळवे, जयंत भावे, सिद्धार्थ शिरोळे, नाना भानगिरे, ज्योत्स्ना एकबोटे, दिलीप वेडे पाटील, योगेश ससाणे, अनिल टिंगरे,कल्पना वरपे, अर्चना मुसळे, प्रवीण चोरबेले, गोपाळ चिंतल, मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी भटक्या डुक्कर आणि कुत्र्यांच्या समस्येवर प्रकाश टाकला.    दरम्यान याबाबत प्रशासना मार्फत खुलासा करताना अतिरिक्त आयुक्त शितल उगले-तेली यांनी सांगितले की,  कुत्र्यांना पकडणे व मारणे यासाठी प्राणी संरक्षणाचे कायदे आहेत. ३७५२ कुत्री आत्तापर्यंत पकडली आहेत. बाणेर येथे पकडलेल्या कुत्र्यांसाठी डॉग स्पॉड केले जाणार आहे. कुत्र्यांची गणणेसंबंधी मोहिम हाती घेतली जाणार आहे. भटक्या डुकरांचा उपद्रव हडपसर परिसरात जास्त आहे. हा व्यावसाय बीगर भांडवली असल्याने हितसंबंध जोपासणारे डुक्कर पकडण्यास जाणा-या कर्मचा-यांवर हल्ले करतात. डुक्कर पकडण्याचे काम ठेकेदारास दिले आहे. पकडलेली डुकरे ओळखी येण्यासाठी डुकराच्या कानाला बिल्ले लावले आहेत. त्यामुळे एकदा पकडलेली डुकर दुसरीकडे सोडली जातात, असे म्हणणे योग्य ठरणार नाही.-----------स्वाईन फ्लू रोखण्यासाठी वेळीच उपाय-योजना करागेल्या काही दिवसांत शहरामध्ये पुन्हा एकदा स्वाईन फ्लूने डोके वर काढले असून, परिस्थिती गंभीर रुप धारण करण्यापूर्वीच महापालिकेने योग्य उपाय-योजना करण्याची मागणी सदस्यांनी केली. तसेच सर्व रुग्णालयांमध्ये टॅमी फ्लू च्या गोळा उपलब्ध करुन देण्याची देखील मागणी करण्यात आली. सदस्यांची तीव्र भावना लक्षात घेता, स्वाईन फ्लूची पाठीमागील परिस्थिती पाहता पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने बैठक घेऊन या समस्येवर त्वरीत उपाय करण्यासाठी हालचाली कराव्यात, अशा सूचना यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिले. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcollectorजिल्हाधिकारीSaurabh Raoसौरभ राव