शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एका चित्रकाराची सातासमुद्रापार गरूड भरारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 18:41 IST

पुण्यातील एका चित्रकाराच्या चित्राची रशिया येथील दहाव्या आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

ठळक मुद्देभारती विद्यापीठाच्या कला महाविद्यालयात २५ वर्षांपासून प्राध्यापक म्हणून कार्यरत क्रुकवेलच्या साहाय्याने चित्रनिर्मिती हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य

पुणे : कोणत्याही कलाकाराच्या आयुष्यात असा एखादा क्षण येतो जो त्याला आजवर कलेसाठी समर्पित केलेल्या जीवनाला सुंदरशी पावती देऊन जातो. पुण्यातील एका चित्रकाराच्या चित्राची रशिया येथील दहाव्या आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या निवडीतून त्यांच्या कलाप्रवासात मानाचा तुरा रोवला गेला असून, पुण्याचीही मान अभिमानाने उंचावली आहे. उमाकांत कानडे असे या प्रसिद्ध चित्रकाराचे नाव आहे. रशिया मध्ये दि. ११ ते २१ एप्रिल या कालावधीत हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. चित्रकार उमाकांत कानडे हे भारती विद्यापीठाच्या कला महाविद्यालयात २५ वषार्पासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या प्रदर्शनासाठी ते दिनांक १० एप्रिल रोजी रवाना होत आहेत. गेल्या तीन दशकापासून चित्रकार उमाकांत कानडे हे सातत्याने चित्रनिर्मिती करत आहे. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन अमेरिका, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया, दुबई, इंडोनेशिया, तसेच दिल्ली ,कोलकात , बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई, मुंंबई आणि पुणे अशा महत्त्वाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहेत. विविध नामांंकित संस्थेत व मान्यवर व्यक्तींकडे त्यांची चित्रे संग्रहित आहेत. क्रुकवेलच्या साहाय्याने चित्रनिर्मिती हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य आहे. क्रुकवेलच्या शैलीतून संपूर्ण कॅनव्हासवर रेषांच्या आधारे विविध छटा निर्माण करून कृष्णधवल रंगसंगतीत त्यांचे चित्र उत्तम परिणाम साधतात. अनेक वर्षांचा अनुभव, अभ्यास, कौशल्य व बैठक यातून कानडे यांनी स्वत: ची चित्रशैली निर्माण केली आहे. चित्रांमध्ये ते झाडे, वेली, पाने , फुले , दगड , गाणारे पक्षी, रंगीत फुलपाखरे अशा निसर्गातील घटकांचा सुरेख वापर करुन ते सुंदर चित्र साकारतात. प्रत्येक ऋतूमध्ये निसर्ग वेगवेगळे रूपधारण करतो व प्राणी, पक्षी त्यानुसार आपले जीवन जगत असतात आणि हा जादुई बदल नेत्रचक्षुला अलौकिक आनंद देत असतो. त्याचाच चित्रात्मक तपशील म्हणजेच कानडे यांची चित्रे होय, अशी एक चित्रकार म्हणून कलाक्षेत्रात त्यांची ख्याती आहे.              

टॅग्स :Puneपुणेpaintingचित्रकला