शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीत पार्किंगसाठी भाविकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 03:50 IST

तीर्थक्षेत्र अलंकापुरीत खासगी तसेच पालिकेच्या पार्किंगवाल्यांकडून भाविकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुटमार केली जात आहे. खासगी जागा किंवा त्या जागेच्या शेजारील विनामालकी जागेत भाविकांनी पार्क केलेल्या वाहनांचेही अधिक दर लावून संबंधितांकडून बळजबरीने पैसे वसूल केले जात आहेत.

आळंदी : तीर्थक्षेत्र अलंकापुरीत खासगी तसेच पालिकेच्या पार्किंगवाल्यांकडून भाविकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुटमार केली जात आहे. खासगी जागा किंवा त्या जागेच्या शेजारील विनामालकी जागेत भाविकांनी पार्क केलेल्या वाहनांचेही अधिक दर लावून संबंधितांकडून बळजबरीने पैसे वसूल केले जात आहेत. अडवणूक करून अव्वाच्या - सव्वा दर आकारले जात असल्याने भाविकांमध्येही प्रचंड नाराजी आहे.संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपºयातून भाविक अलंकापुरीत येत आहेत. मात्र पार्किंगच्या असलेल्या अभावामुळे भाविक मोकळ्या जागेत वाहनांची पार्किंग करून मंदिराकडे मार्गस्थ होत असतात. तर मंदिर पार्किंगच्या जागेची माहिती असलेले भाविक मंदिर पार्किंगमध्ये वाहने पार्क करून दर्शनसाठी जातात. परंतु, पहिल्यांदाच येणाºया भाविकांना पार्किंग माहीत नसल्याने असे भाविक मिळेल त्या मोकळ्या जागेत वाहने पार्क करतात. परिणामी दर्शनानंतर वाहनस्थळी जागेची पावती दाखवत खासगी जागा असल्याचे सांगून भाविकांकडे अव्वाच्या-सव्वा पैशांची मागणी करत आहेत. कायदेशीर पार्किंगवाले पालिकेने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा दुप्पट दराच्या रकमेची पावती छापून भाविकांच्या गळ्यात मारत आहेत.अनेकवेळा वाहनांचे पासिंग नंबर पाहून वेगळी पावती देऊन भाविकांकडून जादा लूट केली जात असल्याची सत्यस्थिती समोर येऊ लागली आहे. वाहनानुसार ५० रुपयांपासून तब्बल ३०० रुपयांपर्यंत पार्किंगचे भाडे आकारले जात आहे.दोन दिवसांपूर्वी पेणच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या चार एसटी सहलीसाठी आळंदीत आल्या होत्या. माऊलींच्या समाधीचे दर्शन झाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांचे या एसटीबसचे प्रत्येकी २०० रुपये आकारण्यात आले. त्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. पार्किंगच्या पावतीवर पालिकेचा शिक्का नाही, जबाबदार अधिकाºयाचे नाव नाही, बनावट पावत्या देऊन शुल्क आकारणे अत्यंत गैर असल्याचे संबंधित शिक्षकाने सांगितले.पार्किंगचे भाडे देण्यास जर भाविकांनी नकार दिला, तर संबंधित व्यक्ती भाविकांना शिवीगाळ करून जबरदस्ती भाडे वसूल करत आहेत. पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी भाविकांमधून जोर धरू लागली आहे.वाहन चोरीला गेले तर आम्ही जबाबदार नाहीआळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून पार्क केलेल्या वाहनाचे जादा दराने पैसे उकळले जात आहे. शहरात कुठल्याही मोकळ्या जागेत वाहने पार्क करून दर्शनानंतर पुन्हा वाहनाशेजारी आल्यानंतर हातात पार्क जागेची पावती दाखवून, ही आमची खाजगी जागा असल्याचे सांगत अधिक रक्कम वसूल करण्याचा धंदा सुरू आहे.पार्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहनातील वस्तूंचीच काय तर वाहन जरी चोरीला गेले तरी ती आमची जबाबदारी नाही, अशी स्पष्ट सूचना पावतीवर छापणारे भाविकांना अधिक लुटत आहे.ठेकेदारांची हमरीतुमरी...पार्किंगसाठी अवाजवी शुल्क आकारून वाहनचालकांची लूट केली जात आहे. याबाबत विचारणा केली तर ठेकेदाराकडून दमदाटी केली जात आहे. उत्पन्नाच्या नावाखाली आळंदीत भाविकांची लूटमार केली जात आहे. यंदा पालिकेने उत्पन्नवाढीच्या दृष्टीने आपल्या मालकीच्या जागेत अथवा रस्त्यावर कुठेही गाडी पार्क करणाºयांकडून शुल्क वसुली करण्याची मुभा ठेकेदारास दिली आहे. भाविकांनी दराबाबत विचारणा केली तर लगेच ठेकेदाराचे कर्मचारी हमरीतुमरीवर येत आहेत. पालिकेने ठेकेदाराला समज देणे आवश्यक आहे. पार्किंगच्या दराबाबत फलक लावून पालिकेची अधिकृत पावती द्यावी. लूटमार थांबवण्यासाठी पावती पुस्तकेही पालिकेनेच छापून द्यावीत. ही लूटमार त्वरित न थांबल्यास जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करणार आहे.- संदीप नाईकरे, कार्यकर्ता, आळंदी विकास मंचपार्किंगसाठीचे पालिकेचे दर अवाजवी आहेत. भाविकांना ठेकेदाराकडून होणारी दमबाजी रोखण्याबाबत पालिकेशी पत्रव्यवहार केला जाणार आहे.- नंदकुमार गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक आळंदी.दरवर्षीपेक्षा २४ लाखांनी जादा उत्पन्न पालिकेला मिळणार आहे. संपूर्ण गावात पार्किंग शुल्क आकारण्यास ठेकेदारास सांगितले आहे.- समीर भूमकर,मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र