शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

लहानग्यांच्या फुलराणीने केली 62 वर्षे पुर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 19:18 IST

लहानग्यांच्या चेहऱ्यावर अानंद फुलविणाऱ्या पुण्यातील पेशवे उद्यानातील फुलराणी या ट्रेनने अाज 62 वर्षे पुर्ण केली. त्यानिमित्त या ट्रेनला फुलांनी तसेच फुग्यांनी सजविण्यात अाले हाेते.

पुणे : लहानग्यांना अानंदाची सफर घडविणारी, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी अशी पुण्यातील पेशवे उद्यानातील फुलराणीने अाज 62 वर्षे पुर्ण केली. 8 एप्रिल 1956 साली सुरु झालेली ही टाॅयट्रेन अनेकांच्या बालपणाची साक्षीदार अाहे. मधल्या काळात ही ट्रेन बंद पडली हाेती. परंतु लाेकाग्रहास्तव ती पुन्हा सुरु करण्यात अाली. लहानग्यांच्या कवितेतील अागीनगाडी त्यांना प्रत्यक्षात सफर घडवत अाहे.     पेशवे उद्यानात असलेल्या फुलराणीला सुरु हाेऊन अाज 62 वर्षे पुर्ण झाली. यानिमित्त या ट्रेनला फुलांनी तसेच फुग्यांनी सजविण्यात अाले हाेते. 1956 पासून ही ट्रेन या उद्यानात असल्याने अनेकांच्या मनात ती पक्की काेरली गेलेली अाहे. रविवार अाणि त्यात फुलराणीचा वाढदिवस असा याेग जुळून अाल्याने सकाळ पासूनच पालकांनी त्यांच्या चिमुकल्यांना घेऊन येथे गर्दी केली हाेती. फुलराणीच्या स्टेशनवर अाल्यावर अापण खराेखरच्या रेल्वे स्टेशनला अालाेय की काय असेच वाटत राहते. झाडांनी अच्छादलेल्या परिसरामधून ही फुलराणी धावताना चिमुकले वेगळ्याच दुनियेत हरवून गेले हाेते. पालक या ट्रेनमधून अापल्या मुलांसाेबत सेल्फी काढत अापल्या मुलांच्या चेहऱ्यावरील अानंद कॅमेरात बंदिस्त करत हाेते. अापल्या बालपणी अाम्ही सुद्धा या ट्रेनमध्ये बसून खूप धमाल केली हाेती असे पालक अापल्या पाल्याला अावर्जुन सांगत हाेते. पुन्हा आपल्या लहानपणीची अाठवण जगताना लहानग्यांबराेबरच पालकांच्या चेहऱ्यावरील अानंद अाेसंडून वाहत हाेता.     गेल्या आठ वर्षांपासून ही फुलराणी चालविणारे अर्जुन राऊत म्हणाले, माझ्या जन्माच्या अाधीपासून ही फुलराणी पेशवे उद्यानात धावत अाहे. मधला काही ही फुलराणी बंद हाेती, नंतर पुन्हा सुरु झाली. गेल्या अाठ वर्षात अनेक चांगले अनुभव अाले. लहानग्यांच्या चेहऱ्यावरील अानंद पाहून अापण करत असलेल्या कामाचे समाधान वाटते. शनिवार-रविवार या फुलराणीत बसायला गर्दी असते. गर्दी नसल्यावर मात्र निराश वाटतं. लहानग्यांना या फुलराणीची सफर घडविण्यातच खरा अानंद अाहे. 

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिक