शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

 छायाचित्रातून छायाचित्रकाराचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन समजतो : निपुण धर्माधिकारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 17:09 IST

‘पीअ‍ॅटपी’ हा छायाचित्रकारांचा २००६ साली सुरु झालेला अनौपचारिक ग्रुप असून, यामध्ये सात हजारांपेक्षा जास्त  छायाचित्रकार जोडले गेले आहेत. हे सर्वजण मिळून दरवर्षी ‘दृष्टीकोन’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करतात.

ठळक मुद्दे७० छायाचित्रकारांनी काढलेल्या ९८ छायाचित्रांचा समावेश

पुणे : चित्र किंवा छायाचित्रांना शब्दांची गरज नसते, हेच या कलेचे महत्व आहे. याशिवाय या कलेतून प्रत्येकाचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोनही आपल्याला समजतो, असे मत प्रसिध्द युवा दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. फोटोग्राफर्स अ‍ॅट पुणे अर्थात पीअ‍ॅटपी यांच्या वतीने आयोजित ‘दृष्टिकोन २०१८’ या नवव्या छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.      ‘प्राईम्स अँड झूम्स’चे संचालक अभिजित मुथा,‘निर्माण फ्रेम्स’च्या संचालिका सीमा लाहोटी, विद्या महामंडळाच्या माजी अध्यक्षा अश्विनी देशपांडे आणि ‘पीअ‍ॅटपी’ ग्रुपचे सदस्य या वेळी उपस्थित होते. ‘पीअ‍ॅटपी’ हा छायाचित्रकारांचा २००६ साली सुरु झालेला अनौपचारिक ग्रुप असून, यामध्ये सात हजारांपेक्षा जास्त  छायाचित्रकार जोडले गेले आहेत. हे सर्वजण मिळून दरवर्षी ‘दृष्टीकोन’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करतात. यावर्षी प्रदर्शनाचे नववे वर्ष असून, यामध्ये ७० छायाचित्रकारांनी काढलेल्या ९८ छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. सुमारे ५ हजार छायाचित्रांमधून या ९८ छायाचित्रांची निवड करण्यात आली आहे. या प्रदर्शनात पोट्रेट्स, मॅक्रो, वाईल्डलाईफ, अ‍ॅबस्ट्रॅक्ट, स्ट्रीट फोटोग्राफी, लँडस्केप आदी वैविध्यपूर्ण आणि निवडक अशा छायाचित्रांचा समावेश आहे.धर्माधिकारी म्हणाले की, या छायाचित्र प्रदर्शनातील छायाचित्रे ही वेगळी आहेत. अगदी पुणे शहरापासून मोरोक्को पर्यंतची अनेकविध छायाचित्रे पाहण्याची संधी या प्रदर्शनात मला मिळाली. चित्रपट आणि नाटकाच्या कथा लिहिल्यानंतर त्याचा ‘अँगल’ बरोबर आहे की नाही यावर मी अनेकदा विचार करतो. या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर फोटोग्राफर्सचा हाच अँगल मलाही समजला. यानंतर या छायाचित्रकारांकडून मी माझ्या पटकथांमधील अँगल समजून घेण्यास उत्सुक राहीन.या प्रदर्शनातून होणा-या विक्रीमधून विद्या महामंडळ या कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जात असलेल्या संस्थेला मदत करण्यात येते. याच मदतीतून या विद्यार्थ्यांचा वर्षाचा खर्च संस्थेमार्फत भागविला जातो. हे प्रदर्शन रविवार (दि. ८ एप्रिल) पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत घोले रस्ता, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे सुरू राहणार आहे. 

टॅग्स :Puneपुणे