शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

फिनिक्स मॉलने पुष्पगुच्छ देऊन केले तृतीयपंथीयांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 18:04 IST

फिनिक्स माॅलमध्ये तृतीयपंथी असलेल्या साेनाली दळवी यांना प्रवेश नाकारण्यात आलेल्या घटनेचा निषेध झाेपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने करण्यात आला. तसेच तृतीयपंथीयांना अाेवाळत त्यांच्यासाेबत फिनिक्स माॅलमध्ये प्रवेश करण्यात अाला.

ठळक मुद्देझाेपडपट्टी सुरक्षा दलाच्यावतीने करण्यात अाले अांदाेलनतृतीयपंथीयांना अाेवाळत करण्यात आला फिनिक्स माॅलमध्ये प्रवेश

पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी तृतीयपंथी असलेल्या सोनाली दळवी यांना फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याच्या निषेध म्हणून झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने तृतीयपंथीयांचे औक्षण करत फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश करत आंदोलन करण्यात आले. मॉल प्रशासनाच्यावतीने पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच अशी घटना पुन्हा घडणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली.     सोनाली दळवी या त्यांच्या मित्रासोबत फिनिक्स मॉलमध्ये गुढीपाडव्यासाठी खरेदी करण्यासाठी गेल्या असता त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच माध्यमांमधून मॉल प्रशासनावर टीका करण्यात येत होती. या प्रकाराबाबत मॉल प्रशासनाने माध्यमांकडे दिलगीरी व्यक्त केली होती. मंगळवारी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्ष भगवान वैराट यांच्या नेतृत्वाखाली तृतीयपंथीयांसोबत फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश करण्यात आला.     यावेळी पोलीसांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मॉलचे व्यवस्थापक आनंद भालेराव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देत तृतीयपंथीयांचे स्वागत करण्यात आले. तसेच यापुढे अशी घटना घडणार नाही अशी ग्वाही देण्यात आली. यावेळी बोलताना भगवान वैराट म्हणाले, तृतीयपंथी व्यक्तींना माणूस म्हणून जगण्याचा आणि लोकशाही राजवटीत सर्वत्र संचार करण्याचा अधिकार आहे. मात्र, फिनिक्स मार्केटसिटी मॉलच्या व्यवस्थापनाने तृतीयपंथी व्यक्तीला मॉलमध्ये प्रवेश नाकारून तिच्या माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारावर आणलेले बंधन चुकीचे आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहे. मॉल व्यवस्थापनाच्या वागणुकीमुळे तृतीयपंथीयांच्या सन्मानाला धक्का पोहोचला असून त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. संपूर्ण समाजाने  तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात सामावून घेतले पाहिजे आणि त्यांना त्यांचे अधिकार मिळवून दिले पाहिजे, असे आवाहन देखील भगवान वैराट यांनी यावेळी केले. 

टॅग्स :PuneपुणेSocial Viralसोशल व्हायरल