शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयांना प्रवेश नाकारल्याप्रकरणी फिनिक्स माॅलची दिलगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 18:44 IST

फिनिक्स माॅलमध्ये तृतीयपंथीयाची अडवणूक केल्याच्या घटनेप्रकरणी माॅलप्रशासनाने माध्यमांकडे दिलगीरी व्यक्त केली अाहे. मात्र जाेपर्यंत लेखी माफी मिळत नाही ताेपर्यंत लढा सुरुच ठेवण्यावर साेनाली ठाम अाहेत.

ठळक मुद्देफिनिक्स माॅलने माध्यमांकडे केली दिलगिरी व्यक्त कुठल्याही अाधारावर भेदभाव करण्याचा हेतू नसल्याचे केले स्पष्ट

पुणे : फिनिक्स मॉलमध्ये तृतीयपंथीयांना प्रवेश न देण्यात आल्याच्या घटनेनंतर मॉल प्रशासनाने माध्यमांकडे आपली भूमिका स्पष्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र जोपर्यंत लेखी माफी मागून यापुढे कोणालाच जात, धर्म, कपडे, लिंग यांच्या आधारावर प्रवेश नाकारणार नाही असे मॉल प्रशासन स्पष्ट करणार नाही, तोपर्यंत हा लढा असाच चालू राहिल असे सोनाली दळवी यांनी स्पष्ट केले आहे.     उच्चशिक्षित असलेल्या सोनाली दळवी या फिनिक्स मॉलमध्ये पाडव्याच्या खरेदीसाठी आपल्या मित्रासोबत गेल्या होत्या. त्यावेळी मॉलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रवेश नाकारला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर मॉल प्रशासनावर सर्वच स्तरातून टीका झाली होती. त्यानंतर आता मॉल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून सुरक्षा तपासणीसाठी सोनाली यांना थांबवून ठेवण्यात आले होते, असे मॉल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तसेच आमचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता, मॉल प्रशासन कुठल्याही प्रकारचा भेदभाव मानत नाही असेही मॉल प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.     याबाबत बोलताना सोनाली दळवी म्हणाल्या, मला लेखी माफीनामा हवा आहे, तोही सर्वांसमोर. तोपर्यंत मी माझा लढा कायम ठेवणार आहे. यापुढे कोणालाही त्याच्या जात, धर्म, लिंग कशावरुनही अडवणूक करणार नाही असेही मॉल प्रशासनाने स्पष्ट करायला हवे. आज अनेक तृतीयपंथी हे माझ्यासारखे उच्च शिक्षित नाहीत. त्यांच्यासोबत असे घडू नये यासाठी मॉल प्रशासनाने जाहीर माफी मागावी. 

टॅग्स :PuneपुणेSocial Viralसोशल व्हायरल