शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासकांवर ‘पीएचडी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 17:34 IST

लाखो विद्यार्थ्यांकडून केवळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून कायमस्वरूपी रोजगार मिळवण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देजगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते.

पुणे : महाराष्ट्रासह देशातील सर्व राज्यांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी केवळ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून कायमस्वरूपी रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, सर्वांनाच स्पर्धा परीक्षांमध्ये यश येत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर निष्कर्ष काढण्याचे काम एका अमेरिकन विद्यार्थ्यांने हाती घेतले असून तो हार्वर्ड विद्यापीठात पीएचडी. करीत आहे.जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. देशातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र, दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत चालली आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांएवजी सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न तरुणांकडून केला जात आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागीतील तरुण- तरुणी केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेतल्या जाणाºया विविध परीक्षांमधून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु, केंद्र व राज्य शासनाकडून खूप कमी जागांवर भरती केली जाते. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमधून अपयश येणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यामुळेच हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थी कुणाल मंगल यांनी पीएच. डी.साठी या विषयाची निवड केली आहे. सध्या ते तरुणांशी संवाद साधत आहेत.  स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागातील विद्यार्थीच मोठ्या संख्येने या परीक्षांचा अभ्यास का करतात? आदी प्रश्न समोर ठेवून केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर तमिळनाडू, दिल्ली, बिहार, छत्तीसगड या राज्यातील तरुण-तरुणींशी कुणाल मंगल संवाद साधत आहेत. त्याचप्रमाणे त्यासंदर्भातील आकडेवारी जमा करण्याचे कामही त्यांनी सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून कुणाल मंगल हे विविध राज्यात फिरून याबाबतची माहिती जमा करीत आहेत. मागील पाच महिन्यांपासून एमपीएससी स्टुडंट्स राईट्सच्या माध्यमातून कुणाल मंगल यांना संशोधनासाठी आवश्यक असलेली अचूक माहिती उपलब्ध होत आहे.

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीexamपरीक्षा