शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलियम कंपन्या करणार बायोगॅसचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 02:34 IST

कचऱ्यातून होणार इंधननिर्मिती; वर्षाला १५ दशलक्ष टन उत्पादनाचे उद्दिष्ट

पुणे : अपारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर वाढावा यासाठी देशातील आॅईल कंपन्यांनी ‘सतत’ अभियान हाती घेतले असून, त्या अंतर्गत बायोगॅस निर्मितीला प्राधान्य देण्यात येणार आहे. देशात २०२३पर्यंत ५ हजार कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यातून वर्षाला १५ दशलक्ष टन जैव इंधनाच्या उत्पादनाचा संकल्प असल्याचे कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.इंडियन आॅइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या कंपन्यांच्या वतीने वाहतुकीच्या शाश्वत पर्यायासाठी शनिवारी रॅली काढली. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे संचालक विजय शर्मा यांच्या हस्ते रॅलीला हिरवा कंदील दाखविण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पर्यायी ऊर्जाचे कार्यकारी संचालक सुबोधकुमार, इंडियन फाउंडेशन फॉर ग्रीन एनर्जीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, मुरली श्रीनिवासन आणि दिलीप पटनाईक या वेळी उपस्थित होते.‘सतत’या मोहिमेद्वारे शेतामध्ये उरलेल्या कच्च्या घटकांचा वापर, गायीचे शेण व नगरपालिकांच्या घनकचºयाचा वापर इंधननिर्मितीसाठी केला जाणार आहे. त्या माध्यमातून शेतकºयांना उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध होईल. ‘सतत’ अभियानांतर्गत, आॅइल मार्केटिंग कंपन्या आॅटोमोटिव्ह क्षेत्रासाठी आवश्यक इंधन देण्याची क्षमता बाळगणाºया उद्योजकांकडून कॉम्पे्रस्ड बायोगॅस (जैविक इंधन) उपलब्ध करून देण्याबाबतचा त्यांचा कल जाणून घेतला जाईल. अर्ज करण्यासाठी ओएमसीजीच्या संकेतस्थळाला मार्च २०१९ पर्यंत भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.वाहतूक क्षेत्रात सीबीजीचा (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) वापर केल्यास, त्याचा कचरा व्यवस्थापनाला उपयोग होईल. तसेच, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. देशात असणाºया सर्व साधनांचा सीबीजी निर्मितीसाठी वापर करण्यात आपण यशस्वी झालो तर, वर्षाला आपल्याला ६२ दशलक्ष टनांपर्यंत सीबीजी उपलब्ध होईल. त्यातून देशातील गॅस मागणीला सर्वोत्तम पर्याय उपलब्ध होईल. त्या माध्यमातून इंधनावरील परदेशी अवलंबित्वदेखील कमी होईल.- विजय शर्मा, नैसर्गिक वायू मंत्रालयाचे संचालक

टॅग्स :Puneपुणे