शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पेट्रोल दरवाढीचा चटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 21:21 IST

गेल्या काही काळापासून पेट्राेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ हाेत अाहे. अाज पुण्यात पेट्राेल 81.54 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 67.71 रुपयांवर गेले अाहे. त्यामुळे नागरिकांना याचा भुर्दंड सहन करावा लागत अाहे.

ठळक मुद्देपुण्यात पेट्राेल 10 पैशांनी तर डिझेल 12 पैशांनी महागदरवाढ कमी करण्याची नागरिकांची मागणी

पुणे : पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ झाली असून पुण्यात पेट्रोलच्या दरात १० पैशांनी तर डिझेलच्या दरात १२ पैशांनी वाढ झाली आहे. हि गेल्या काही दिवसांमधील मोठी दरवाढ असून सोमवारी पुण्यात पेट्रोल ८१.५४ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ६७.७१ रुपयांवर जाऊन ठेपले आहे. याचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत असून दैनंदिन बजेट कोलमडल्याची भावना नागरिकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.     गेल्या वर्षभरापासून रोज पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने बदलत आहेत. अपवाद वगळता या दरांमध्ये वर्षभर वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आत्ताची दरवाढ ही दिल्लीतील चारवर्षातील उच्चांकी दरवाढ आहे. दिल्लीत पेट्रोल ७३.७३ तर डिझेल ६४.५८ रुपये प्रतिलिटर इतके झाले आहे. त्यामुळे नागरिक या दरवाढीने हैरान झाले असून या दरवाढीवर नियंत्रण आणण्याची मागणी ते करत आहेत.     पेट्रोलचे दर दरदिवशी बदलले जात आहेत. रोज या दरांमध्ये काही पैशांची वाढ किंवा घट होत आहे. गेल्या वर्षभरात अशी मोठ्याप्रमाणावर दरवाढ झाली आहे. पैशांमध्ये ही वाढ होत असल्याने नागरिकांना ते लक्षात येत नाही. मात्र रविवारी मध्यरात्री या दरांमध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे देशातील सर्वच शहरांमधील पेट्रोलचे दर १० ते १८  पैशांनी वाढल्याचे चित्र आहे. पेट्रोलचे दर वाढल्यामुळे आपोआपच इतर वस्तूंचे तसेच सेवांचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यात १० आॅक्टोबर २०१७ मध्ये पेट्रोल ७५.५४ रुपये प्रतिलिटर होते तर डिझेल ५८.५९ रुपये इतके होते. सोमवारी मात्र पेट्रोलचा दर वाढून ८१.५४ रुपयावर तर डिझेल ६७. ७१ रुपयांवर जाऊन ठेपले आहे.     याबाबत बोलताना सचिन मोकाटे म्हणाले, दररोज बदलणाऱ्या दरांमुळे हळूहळू होणारी दरवाढ लक्षात येत नाही. मात्र आता पेट्रोल ८१ रुपयांवर पोहचल्याने भुर्दंड आम्हाला सहन करावा लागत आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात अनेक अडचणी निर्माण होत आहेत.     मुग्धा नगरकर म्हणाल्या, रोजच्या दरवाढीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे. पेट्रोल वाढले की इतर वस्तूंचे भावही वाढतात, त्यामुळे महिलांचे घरातील बजेट कोसळत आहे. सगळ्यांनाच या दरवाढीचा फटका बसत आहे. पुण्यातील एका पेट्राेलपंपाचे व्यवस्थापक गणपत काेळी म्हणाले, रोज पेट्रोल व डिझेलचे दर बदलत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात येत नाही. मोठी दरवाढ झाल्यानंतर इतके कसे पेट्रोल महाग झाले अशी विचारणा नागरिकांकडून करण्यात येते. गेल्या काही काळापासून पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. 

टॅग्स :PuneपुणेPetrolपेट्रोलGovernmentसरकार