शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

पेट्रोलमाफिया लोणी काळभोरला सक्रिय, मास्टर कीने चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:05 IST

हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड टर्मिनलमधून बाहेर पडणाऱ्या टँकरमधून मास्टर की वापरून पेट्रोल-डिझेलमाफिया पुन्हा सक्रिय झाले आहे. शनिवारी दोन चोरट्यांना पकडण्यात पेट्रोल-डिझेल असोसिएशनचेपदाधिकाºयांना यश आले होते.

लोणी काळभोर - येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड टर्मिनलमधून बाहेर पडणाऱ्या टँकरमधून मास्टर की वापरून पेट्रोल-डिझेलमाफिया पुन्हा सक्रिय झाले आहे. शनिवारी दोन चोरट्यांना पकडण्यात पेट्रोल-डिझेल असोसिएशनचेपदाधिकाºयांना यश आले होते. परंतु, त्यांच्या हातावर तुरी देऊन पेट्रोलचोर चारचाकी गाडीतून पळून जाण्यात यशस्वी झाले.या प्रकरणी हवेलीचे तालुका पुरवठा निरीक्षक अविनाश भगवान डोईफोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी मास्टर कीच्या साह्याने उघडलेले कुलूप, चोरलेले २० लिटर डिझेल व चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी दोनच्या ही घटना उघडकीस आली. पुण्यातील पेट्रोल-डिझेल असोसिएशनच्या पदाधिकाºयांना लोणी काळभोर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड टर्मिनल टर्मिनलमधूनबाहेर पडणाºया टँकरमधून काही चोरटे पेट्रोलजन्य मालाची चोरी करत असल्याची माहिती मिळाली. याची शहनिशा करण्यासाठी असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप रूकारी हे त्यांचे सहकारी जुबेन जाफरभाई, मोरेश्वर काळे, हर्षद काटकर यांच्यासमवेत आले. पाहणी करण्यासाठी ते टर्मिनल गेटसमोर असलेल्या पार्किंगमधून फिरत असताना तेथे टॅकर (एमएच १२ डीजी ०९५७) हा टर्मिनल मधून पेट्रोलजन्य पदार्थ भरून आला व तो पार्किंगमध्ये लावून चालक संजय विठ्ठल सुरवसे (रा. खदारी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद ) हा चलन आणण्यासाठी आॅफिसमध्ये गेला. हा वेळ साधून तेथे आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या जवळील चावीने टॅकरच्या वरच्या झाकणाचे कुलूप उघडले. त्यात पाईप टाकून एका प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये डिझेल काढू लागले. असोसिएशनचे पदाधिकारी यांनी त्यांना जागीच पकडले. त्यांच्याकडून उघडलेले कुलूप व तीन चाव्या तसेच कॅनमध्ये असलेले २० लिटर डिझेल ताब्यात घेतले. व त्या दोघांचा फोटो काढला.यानंतर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तेथून पोलीस उपनिरीक्षक ननवरे, पोलीस हवालदार समीर चमनशेख, सांगळे, सागर कडू हे पोहोचले. तत्पूर्वी असोसिएशनचे पदाधिकारी यांनी तेथे पांढºया रंगाची मारुती कार (एमएच १४ एफ ३८४१) तेथे दिसली. त्यामध्येही पेट्रोल, डिझेलचा साठा होता. पदाधिकारी पाहणी करण्यात दंग आहेत याचा मोका साधून ते दोघेही कार घेऊन फरार झाले. पोलीस पथक तेथे पोहोचले नंतर त्यांनी माल जप्त केला व पुरवठा विभागास कळवले. पुरवठा निरीक्षक डोईफोडे तेथे पोहोचले व त्यांनी पंचनामा करून दोन अज्ञात इसमांविरोधात फिर्याद दिली.- रासरोजपणे महामार्गालगत पेट्रोलजन्य पदार्थ बनावट चाव्यांचा वापर करून दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात पळवले जात असल्याची माहिती पुणे येथे मिळते; परंतु, येथून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यास किंवा हिंदुस्थान पेट्रोलियम टर्मिनल किंवा भारत पेट्रोलियम टर्मिनलच्या पदाधिकारी अथवा पोलिसांना कशी मिळत नाही की ते या बाबीकडे मुद्दामहूनच कानाडोळा करतात, अशी चर्चा या परिसरात दिवसभर सुरू आहे.- टर्मिनलमधून माल भरून कुलूप लावल्यानंतर बाहेर पडलेल्या टँकरच्या वरच्या झाकणाची एक चावी कंपनीकडे टर्मिनलमध्येतर दुसरी पंपमालकाकडे असते, मग चोरट्यांकडे तीन चाव्या कोठून आल्या, असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे या प्रकरणात टर्मिनलमधील एखादा अधिकारी सामिल असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या