शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेलचा खप 118 कोटी टनांनी घटला; उद्योग, पर्यटन, कॅब वाहतूक घटल्याने फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 06:50 IST

टाळेबंदीचा परिणाम : उद्योग, पर्यटन, कॅब वाहतूक घटल्याने फटका

पिंपरी (पुणे) : टाळेबंदीमुळे मालवाहतूक, पर्यटन, कॅब वाहतूक याला मोठा फटका बसला. त्यामुळे गेल्या वर्षभरात डिझेलची मागणी १२ आणि पेट्रोलची मागणी सात टक्क्यांनी घटली आहे. डिझेलची मागणी ९८ लाख ३३ हजार आणि पेट्रोलची मागणी २० लाख २४ हजार टनांनी घटली आहे. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत आर्थिक वर्षात  १ कोटी १८ लाख ५७ हजार टनांनी घट झाली आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. इंधनाच्या मागणीत प्रथमच इतकी घट झाली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च २०२० मध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली. जवळपास दीड महिना देशातील व्यवहार ठप्प होते. विविध राज्यांनी जिल्हाबंदी अथवा जिल्हा अंतर्गत प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले होते.

काहीकाळ आंतरराज्य वाहतूक बंद होती. त्यामुळे इंधनाच्या मागणीत मोठी घट झाली. टाळेबंदी उठविल्यानंतर फेब्रुवारीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत वाढ होऊ लागली. मार्चमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत इंधनाच्या मागणीत वाढ झाली. आता टाळेबंदी सुरू झाल्याने पुन्हा मागणी घटली आहे. पेट्रोल ॲण्ड डिझेल असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला म्हणाले, गेले वर्षभर टाळेबंदीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत मोठी घट झाली आहे. 

मार्चमध्ये इंधन मागणी वाढली

मार्च २०२० च्या तुलनेत मार्च २०२१ मध्ये डिझेलचा खप ५६.५९ लाख टनावरून ७२.२३ लाख टनांवर गेला. पेट्रोलचा खपही २१.५५ लाख टनांवरून २७.३९ लाख टनांवर गेला. ही वाढ अनुक्रमे २७.६ आणि २७.१ टक्के आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलPuneपुणे