शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
2
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
3
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
4
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
5
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
6
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
7
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
8
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
9
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
10
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
11
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
12
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
13
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
14
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
15
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
16
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
17
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
18
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
19
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
20
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
Daily Top 2Weekly Top 5

पाळीव प्राण्यांसाठी आता परवानगी लागणार ; नियमावली लवकरच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 14:21 IST

प्राण्यांच्या स्वच्छतेबाबत, आवाजाबाबत, भुंकण्याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी लोकप्रतिनिधी, पालिकेपासून थेट पोलीस ठाण्यापर्यंत जात आहे.

ठळक मुद्देपुणे महापालिकेचे स्वतंत्र धोरणशहरामध्ये पाळीव प्राणी पाळण्यावर निर्बंध येणार

पुणे  :  शहरामध्ये कुत्रा, मांजर सारखे पाळीव प्राणी पाळणारे लाखो पुणेकर असून, त्यांना पाळीव प्राण्यांसाठी महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. महापालिका हद्दीत रहिवाशी भागांमध्ये वैयक्तिकरित्या किती व कोणते पाळीव प्राणी पाळावेत याबाबत महापालिका स्वतंत्र धोरण तयार करत असून, यासाठी स्वतंत्र नियमावली करण्यात येणार आहे. याबाबत महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत स्वतंत्र ठराव मंजूर करण्यात आला आहे. मेट्रो सिटी म्हणून ओळख निर्माण होत असलेल्या पुणे शहरामध्ये पाळीव प्राण्याची प्रामुख्याने कुत्रा, मांजर सारखे प्राणी पाळणा-या पुणेकरांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, शहरात अनेक प्रकारचे पाळीव प्राणी वैयक्तिकरीत्या पाळले जातात, याबाबत या प्राण्याचे पालनपोषण करताना नागरिकांनी किती प्राणी पाळावेत, याचे काहीही नियम सध्या अस्तित्वात नाहीत. गेल्या काही वर्षांत शहरात सर्वच भागांत वस्तीभाग, अपार्टमेंट, सोसायट्या, बंगले येथे एक-दोनपेक्षा अधिक पाळीव प्राणी असणारी लाखो कुटुंबे आहेत. परंतु, या प्राण्यांच्या स्वच्छतेबाबत, आवाजाबाबत, भुंकण्याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी लोकप्रतिनिधी, पालिकेपासून थेट पोलीस ठाण्यापर्यंत जात आहे. या पाळीव प्राण्यांवरून शहरामध्ये काही सोसायट्यांत मोठे वाददेखील निर्माण झाले आहेत. गेल्या काही वर्षांत पाळीव प्राण्यांवरून मारहाण करण्याचे प्रकार देखील घडलेले आहेत. परंतु, याबाबत सध्या पुणे शहरात कोणत्याही प्रकारची नियमावली नसल्याने कारवाई करताना अडचणी येत असून, पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सर्व गोष्टींमुळे पुणे शहरात पाळीव प्राण्याबाबत नियमावली करण्याची मागणी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी केली होती. त्यानुसार नुकत्याच झालेल्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत या प्रस्तावावर चर्चा करून महापालिकेच्या रहिवासी भागांमध्ये वैयक्तिकरीत्या किती व कोणते प्राणी पाळावेत, याबाबात स्वतंत्र धोरण व नियमावली बनविण्यासाची कार्यवाही सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. .अनेक देशांत बंधनकारक सध्या अनेक देशांत पाळीव प्राण्यांबाबत विविध कायदे अस्तित्वात आहेत. तर काही स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्राणी पाळण्यावर संपूर्ण बंदीही घातली आहे. मांजर, कुत्रा पाळण्यासाठी कायदेशीर परवाना काढणेही कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुणे शहरामध्ये पाळीव प्राणी पाळण्यावर निर्बंध येणार असून, स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार आहे.

टॅग्स :Puneपुणेdogकुत्रा