शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पेस्ट कंट्रोल बेतले जीवावर, गुदमरून दाम्पत्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 09:02 IST

पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरात योग्य ती काळजी न घेतल्याने पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

पुणे : पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरात योग्य ती काळजी न घेतल्याने पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना बिबवेवाडी परिसरातील गणेश विहार सोसायटीत बुधवारी घडली. अविनाश मजली (वय 64) आणि अपर्णा मजली (वय 54) अशी मृतांची नावे आहेत. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजली कुटुंबाने दाम्पत्याने मंगळवारी (11 फेब्रुवारी) घरात पेस्ट कंट्रोल केले आणि खबरदारी म्हणून ते नातेवाईकांच्या घरी गेले होते. तो दिवस त्यांनी बाहेरच घालवला आणि  सायंकाळी घरी परत आले. परंतु पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरात आल्यावर त्यांनी हवा खेळती राहावी म्हणून घराची खिडक्या, दारे उघडली नाहीत. पंखा चालू न करता टीव्ही पाहात बसले. काही वेळाने तयार झालेल्या वायूने चक्कर येऊन दोघेही खाली पडले. त्यांच्या मुलीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले केले. मात्र  तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

यापूर्वीही पुण्यातीलच भारती विद्यापीठ आणि सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर काळजी घेतल्याने बीडवरून काम करण्यासाठी आलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पेस्ट कंट्रोल नंतर योग्य काळजी घेण्याची आवाहन पोलिसांनी केले आहे.