शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पेस्ट कंट्रोलमुळेच बालकाचा मृत्यू, आनंदनगरमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 03:12 IST

आनंदनगर येथील डोंगरे कुटुंबीयांचा ९ वर्षांचा मुलगा सार्थक याचा मृत्यू घरात केलेल्या औषधफवारणीमुळे (पेस्ट कंट्रोल) झाला की विषबाधेमुळे, याचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही.

पुणे : आनंदनगर येथील डोंगरे कुटुंबीयांचा ९ वर्षांचा मुलगा सार्थक याचा मृत्यू घरात केलेल्या औषधफवारणीमुळे (पेस्ट कंट्रोल) झाला की विषबाधेमुळे, याचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही़ ससून रुग्णालयात सार्थकचे शवविच्छेदन केल्यानंतर डॉक्टरांनाही त्याचे निदान होऊ शकले नाही़ त्यांनी व्हिसेरा रासायनिक पृथक्करणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविला असून, त्यांचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल.  दरम्यान, डोंगरे यांचा दुसरा मुलगा साहिल (वय ११) यांची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ डोंगर पती-पत्नींना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की संदीप डोंगरे हे पत्नी जान्हवी व दोन मुलांसह आनंदनगरमधील सिद्धार्थ अपार्टमेंटमध्ये राहतात. संदीप हे तुळजा भवानी इंटरप्रायझेस येथे औषधफवारणीचे काम करतात़ घरात ढेकूण झाल्याने त्यांनी रविवारी रात्री औषधफवारणी केली आणि घर बंद करून ते विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गेले होते़ तेथून रात्री अडीच वाजता परत आले़ त्यांनी बाहेरून भेळ आणली होती़ ती खाऊन ते झोपी गेले़पहाटे अचानक या चौघांना उलट्या व जुलाबांचा त्रास सुरू झाला़ संदीप याांनी रुग्णालयात न जाता बाहेरून गोळ्या आणल्या़ सोमवारी सायंकाळी सार्थकला रक्ताची उलटी झाली तेव्हा त्यांनी घाबरून त्याला रुग्णालयात नेले़ तोपर्यंत तो अस्वस्थ झाल्याने डॉक्टरांनी त्याला ससून रुग्णालयात नेण्यास सांगितले़ मात्र, ससूनमध्ये नेल्यानंतर तेथे त्याचा मृत्यू झाला़पोलीस उपनिरीक्षक जे़ एस़ मोहिते अधिक तपास करीत आहेत़भेळीचे नमुनेही तपासणीसाठीपोलिसांनी डोंगरे कुटुंबीयांनी खाल्लेल्या भेळीचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत़ सार्थकच्या व्हिसेराचा रासायनिक प्रयोगशाळेच्या अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजणार असून प्राथमिक तपासणीत औषधफवारणीमुळे ही घटना घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे़सार्थकचा मोठा भाऊ साहिल व संदीप यांनाही त्रास सुरू झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ संदीप यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले़; मात्र साहिलची प्रकृती अद्याप गंभीर आहे़

टॅग्स :Deathमृत्यूnewsबातम्या