शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 02:38 IST

राज्यात खरीप पिकांची १३२.८५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून भात, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस आदी पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

पुणे : राज्यात खरीप पिकांची १३२.८५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून भात, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस आदी पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यात महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून औषधांचा पुरवठा संथ गतीने होत असून, महामंडळाकडील प्रोफेनोफॉस या औषधाच्या तांत्रिक घटकाचा साठा संपला आहे. मात्र, कृषी विद्यापीठांनी शिफारस केल्यानुसार शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या कीटनाशकांसाठी ५० टक्के अनुदान दिले जात आहे, असे कृषी विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.कृषी विभागातर्फे राज्याचा खरीप हंगामाचा १६ आॅगस्टपर्यंतचा पीकपेरणी अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात राज्याच्या सर्व जिल्ह्यांतील पिकांवर पडलेल्या रोड व किडीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार, भातपिकावर खोडकिडा, पाने खाणारी अळी व गोदमाशी या किडीचा; तर करपा, कडाकरपा व तांबेरा या रोगांचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला आहे. मूग व उडीद पिकांवर मावा या किडीचा, सोयाबीन पिकावर पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, चक्री भुंगा व उंट अळीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव अढळून आला. कापूस पिकावर मावा, तुडतुडे, शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे. कृषी विद्यापीठाकडून या सप्ताहात पीक संरक्षणाच्या दृष्टीने कापूस, सोयाबीन व भातपिकासाठी सल्ले दिले आहेत. तसेच, कीडरोग व्यवस्थापनासाठी राज्यातील शेतकºयांना १८ लाख ९८ हजार एसएमएस पाठविले आहेत. गुलाबी बोंडअळीचे पतंग पकडण्यासाठी राज्यातएकूण २०४ गावांमध्ये क्षेत्रीय प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जात आहे. तसेच, बोंडअळी नियंत्रण व कीटकनाशकांसाठी ८०२.५० लाख रुपये निधीची तरतूद केली असून कीड व्यवस्थापनासाठी अतिरिक्त १६.९७ कोटींचा निधी शासनाकडून उपलब्ध होईल, असे कृषी अहवालात आहे.गुलाबी बोंडअळीमुळे नुकसानराज्यात कापूस पिकाखालील २६ जिल्ह्यांत एकूण २० हजार १६० गावांमध्ये पेरणी झाली असून, त्यात आॅगस्ट महिन्याच्या तिसºया आठवड्यात ५ हजार ७६४ गावांमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानाच्या पातळीच्यावर दिसून आला.तसेच, कापूस पिकावरील कीड व रोगांच्या नियंत्रणाकरिता एकूण १ लाख ९ हजार ६४४ लिटर औषधांची महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. मात्र, औषधांचा पुरवठा संथ गतीने होत आहे.किडींचा धोकापुणे विभागात भात,बाजरी पिके फुटवे फुटण्याच्या अवस्थेत, मका, सूर्यफूल, सोयाबीन व भुईमूग पिके वाढीच्या अवस्थेत; तर मूगपीक फुलोरा ते दाणे भरण्याच्या व उडीदपीक वाढीच्या ते फुलोरा या अवस्थेत आहे.विभागात काही ठिकाणी मूग व उडीद पिकांवर मावा किडीचा, सोयाबीन पिकावर पाने खाणारी अळी, चक्री भुंगा व मावा किडीचा तर कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस