शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सुविचार लिहीणारा माेदी समर्थक दिसताे ; रावतेंचा टाेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 18:50 IST

‘व्यसनांचा करू धिक्कार, विकास योजनांना लावू हातभार’ हा फलक पाहून व्यसनाचा धिक्कार करून विकास योजनांना हातभार लागणार कसा? या सुविचारावर रावते यांनी ‘लिहणारा मोदी समर्थक दिसतो.’ म्हणताच उपस्थितांमध्ये हशा उसळला.

पिंपरी : वल्लभनगर येथील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या आगारात चालक, वाहक विश्रांती कक्षाच्या उद्घाटनास परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित होते. यावेळी कक्षातील ‘व्यसनांचा करू धिक्कार, विकास योजनांना लावू हातभार’ हा फलक पाहून व्यसनाचा धिक्कार करून विकास योजनांना हातभार लागणार कसा ? या सुविचारावर रावते यांनी ‘लिहणारा मोदी समर्थक दिसतो.’ म्हणताच उपस्थितांमध्ये हशा उसळला.  शिवसेना आणि भाजपाच्या युतीचे गुऱ्हाळ सुरू आहे. शिवसेना आणि शिवसेना नेते भाजपा आणि नेत्यांना कोंडीत पकडण्याचे सोडत नाहीत. टीकेतूनही स्वानंद घेत असतात. असाच एक किस्सा आज घडला. पुणे-मुंबई महामार्गावरील वल्लभनगर आगारात रोटरी क्लब पिंपरी टाऊन आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने चालक, वाहक विश्रांती कक्षाचे उद्घाटन आज झाले. त्यावेळी दिवाकर रावते उपस्थित होते. त्यावेळी कक्षाची पाहणी त्यांनी केली. आसनव्यवस्था, बेड, स्वच्छतागृहात जाऊन त्यांनी पाहणी केली.   सूचनाही केल्या या कक्षातील भिंतीवर विविध सुविचार लिहिलेले आहेत. 

त्यापैकी  ‘व्यसनांचा करू धिक्कार, विकास योजनांना लावू हातभार’ या सुविचाराजवळ रावते उभे राहिले. हा सुविचार वाचला. व्यवसनांचा करू धिक्कार आणि विकास योजनांना कसा काय हातभार लावणार? त्यावर उपस्थिांपैकी एक जण म्हणाले, ‘चालक वाहकांना चांगले वाटावे म्हणून सुविचार लिहले आहेत. त्यावर चुकीच्या सुविचारातून चुकीचा संस्कार होत असतो. व्यसनांचा धिक्कार करून कसा काय विकास साधणार. मला वाटते सुविचार लिहणारा हा मोदी समर्थक असावा.’’ या रावते यांच्या वाक्यावर उपस्थितांमध्ये जोरदार हास्य उमटले. त्याचवेळी संतोष मानेचे उदाहरण देत रावते म्हणाले, ‘‘चुकीमुळे अर्थही चुकीचा निघतो. त्यामुळे सुविचार हे सुविचारच हवेत. काहीतरी चुकल्यामुळे संतोष मानेची फाशी रद्द करावी लागली.’’ त्यानंतर रावते यांनी कक्षाची पाहणी करून चालक वाहकांना झोपण्यासाठी जागा देऊन चालणार नाही, त्यांना आरामाची झोप येण्यासाठी गाद्या, वातानुकुलीत यंत्रणा आणि  तर त्यांचे मन प्रसन्न राहिल यादृष्टीनेही मनोरंजनासाठी उपाययोजना करायला हव्यात याविषयी सूचना केल्या.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड