शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण खात्याकडून उड्डाणपुलाला परवानगी मात्र पुणे पालिकेकडून घेणार भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 18:04 IST

अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या घोरपडी येथील पुणे मिरज रेल्वे लाईन व पुणे सोलापूर रेल्वे लाईन येथील उड्डाणपुलांना संरक्षण खात्याने परवानगी दिली, मात्र त्या बदल्यात ते पालिकेकडून जागेपोटी एकूण किमतीच्या ५ टक्के म्हणजे ४ कोटी रूपये घेणार आहेत.

ठळक मुद्देजागेच्या बदल्यात महापालिकेने लष्कराकडे ठेवायचे आहेत जवळपास ४ कोटी रूपयेआठ अधिकार्‍यांच्या कुटुंबांसाठी मागणीप्रमाणे बांधून द्यायचे आहेत निवास

पुणे : गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या घोरपडी येथील पुणे मिरज रेल्वे लाईन व पुणे सोलापूर रेल्वे लाईन येथील उड्डाणपुलांना संरक्षण खात्याने परवानगी दिली खरी, मात्र त्या बदल्यात ते महापालिकेकडून जागेपोटी एकूण किमतीच्या ५ टक्के म्हणजे ४ कोटी रूपये घेणार आहेतच, तसेच लष्करी अधिकार्‍यांसाठी त्यांची निवासस्थानेही त्यांच्या मागणी व डिझाईननुसार बांधून घेणार आहेत.रेल्वे उड्डाणपुलासाठी परवानगी देताना संरक्षण खात्याने टाकलेल्या अटींना मान्यता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने शुक्रवारी सर्वसाधारण सभेसमोर ठेवला, त्यावेळी यातील बाबींवर विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुप, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी प्रकाश टाकला. पूल बांधण्याला विरोध नाही, मात्र या काय अटी प्रशासन मान्य करीत आहे अशी विचारणा करीत शिंदे यांनी त्या अटीच सभागृहात वाचून दाखवल्या.परवानगी दिली म्हणून महापालिकेने पुढील ३० वर्षे दरवर्षी दोन्ही पुलांचे मिळून ११ हजार ५६४ रूपये परवाना शुल्क दरवर्षी एप्रिल महिन्याच्या १० तारखेपर्यंत संरक्षण विभागाकडे जमा करायचे आहे. पुलांच्या जागेच्या बदल्यात महापालिकेने एकूण किमतीच्या ५ टक्के म्हणजे जवळपास ४ कोटी रूपये अनामत म्हणून लष्कराकडे ठेवायचे आहेत. पुलाचे बांधकाम करताना ज्या इमारतींचे नुकसान होणार आहे, त्या महापालिकेने त्यांच्या डिझाईननुसार बांधून द्यायच्या आहेत. त्याशिवाय संरक्षण विभागाने सूचवलेल्या त्यांच्या क्षेत्रातील जागेवर त्यांनी सुचवलेल्या डिझाईननुसार आठ अधिकार्‍यांच्या कुटुंबांसाठी मागणीप्रमाणे निवास बांधून द्यायचे आहेत. दोन्ही पुलांसाठी या वेगवेगळ्या अटी संरक्षण खात्याने दिल्या आहेत.शिंदे यांनी यावर टीका करीत आपले अधिकारी अशा अटी कशा मान्य करतात अशी विचारणा केली. पुलाच्या बांधकामामुळे पाडल्या जाणार्‍या इमारतींची पुनर्बांधणी, त्यांनी दिलेल्या जागेवर करून देणे योग्य आहे. मात्र अधिकार्‍यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांच्या खासगी मिळकतीच्या जागेवर घरे कशासाठी बांधून द्यायची असे ते म्हणाले. तुपे यांनीही ही गोष्ट अयोग्य असल्याचे सांगितले. महापालिकेचे प्रकल्प अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी यावर खुलासा करण्याचा प्रयत्न केला, मात्र शिंदे यांनी त्या अटीच वाचून दाखवल्या व याचा वेगळा काही अर्थ होत असेल तर सांगा असे आव्हान दिले. अखेर खासगी मिळकती हे शब्द वगळण्याची उपसूचना तुपे यांनी दिली. या प्रभागातील नगरसेवक उमेश गायकवाड, मंगला मंत्री यांनी पुलाच्या कामाला मंजूरी मिळाल्याबद्धल समाधान व्यक्त केले. गायकवाड यांनी लवकरच काम सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. रेल्वे हद्दीतील ज्या बांधकामांचे नुकसान पुलामुळे होणार आहे अथवा स्थलांतर करावे लागणार आहे त्यासाठीच्या अटीही या प्रस्तावातून मंजूर करून घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता कामाला विलंब लागू नये, या परिसरातील नागरिकांची हे दोन्ही उड्डाणपूल म्हणजे गरज होती, ती आता पूर्ण होत आहे, असे गायकवाड व मंत्री म्हणाले. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिका