शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीला कायमस्वरूपी भामा-आसखेडचे पाणी - दिलीप कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 02:30 IST

राज्यातील महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र आळंदी असल्याने येथील पिण्याच्या पाण्यासाठी भामा-आसखेड धरणातील पाण्याचे आरक्षण हे कायमस्वरूपी राहणार असल्याची ग्वाही सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी येथे दिली.

आळंदी - राज्यातील महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र आळंदी असल्याने येथील पिण्याच्या पाण्यासाठी भामा-आसखेड धरणातील पाण्याचे आरक्षण हे कायमस्वरूपी राहणार असल्याची ग्वाही सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी येथे दिली.राज्य शासनाचे नियोजन विभागाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील तरतुदीतून कोट्यवधी रुपये खर्च करून श्रीक्षेत्र आळंदी पाणीपुरवठा योजनेत विकसित करण्यात आलेल्या चार पाण्याच्या टाक्यांचा लोकार्पण सोहळा, तसेच विविध योजनांचा थेट लाभार्थ्यांना लाभ राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले, गटनेते पांडुरंग वहिले, मुख्याधिकारी समीर भूमकर, भाजपाचे खेड तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, जिल्हा सरचिटणीस पांडुरंग ठाकूर, नगरसेवक सचिन गिलबिले, प्रशांत कुºहाडे, संतोष गावडे, नगरसेविका मीरा पाचुंदे, प्रमिला रहाणे, प्रतिभा गोगावले, स्मिता रायकर, सुनीता रंधवे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, दिनेश घुले, बांधकाम अभियंता संघपाल गायकवाड, पाणीपुरवठा विभागप्रमुख दत्तात्रय सोनटक्के, करसंकलक रामदास भांगे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांच्या कार्याचे कौतुक करीत यावेळी राज्यमंत्री कांबळे यांच्या हस्ते मुख्याधिकारी भूमकर यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी नगर परिषदेच्यावतीने राज्यमंत्री कांबळे यांचा नागरी सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.जाहीर कार्यक्रमात नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी प्रास्ताविक केले. माजी नगरसेवक अशोक उमरगेकर यांनी सूत्रसंचालन केले. उपनगराध्यक्ष सागर भोसले यांनी आभार मानले.राज्य शासनाची बांधकामे अधिकृत करण्याच्या निर्णयाची कार्यवाही आळंदी नगर परिषद करीत आहे. यातून गोरगरिबांच्या घरांना नियमित करून दिलासा दिला जात आहे. या योजनेची घोषणा करण्यात आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. येथील दलितवस्तीच्या विकासकामांच्या प्रस्तावांना तत्काळ मंजुरी दिली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.- दिलीप कांबळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री

टॅग्स :AlandiआळंदीWaterपाणी