शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा : डॉ. राजेंद्र जगताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 19:18 IST

पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बीजगोळे (सीडबॉल) निर्मिती उपक्रम राबवण्यात आला. 

ठळक मुद्देचिंच, बहावा, आपटा, कांचन, खैर, तामण, बाभूळ, आवळा, पारिजातक, बकुळ अशा स्थानिक झाडांच्याच बिया नुसत्या बिया टाकल्यास त्याला कीड, बुरशी

पुणे : बीजगोळे निर्मिती करून पर्यावरणाला हातभार लावतानाच हा उपक्रम राबविताना नागरिकांच्या दारी स्मार्ट सिटीचे काम पोचवून आणि त्यांच्या समस्या, सूचना जाणून उपाययोजना करण्यासाठी त्या विचारात घेतल्या जातील. अशा प्रकारे आम्ही स्मार्ट सिटीच्या विकासकामांमध्ये नागरिकांना सहभागी करून घेत आहोत, असे मत पुणे स्मार्ट सिटी मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केले.पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सोसायटी फॉर सायन्स एन्व्हायर्न्मेंट अँड पीपल (सेप) आणि भवताल मॅगझीन यांच्या वतीने बाणेर, औंध, बालेवाडी परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये बीजगोळे (सीडबॉल) निर्मिती उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व सहभागी झाले होते. बालेवाडी येथील कम्फर्ट झोन सोसायटीमध्ये या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून पुणे स्मार्ट सिटी मिशनमध्ये थेट नागरिकांचा सहभाग वाढवता येणार आहे. तसेच तयार झालेले बीजगोळे त्या-त्या भागात झाडे लावण्यासाठी उपयोगात आणले जाणार आहेत. पुणे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बाणेर, औंध, बालेवाडी या भागात विविध योजना राबवण्यात येत आहे. त्यात आता या हरित उपक्रमाची भर पडणार आहे, असेही डॉ. जगताप यांनी सांगितले. यावेळी कम्फर्ट झोन सोसायटीच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आबालवृद्धांनी या उपक्रमात सहभागी होत बीजगोळे तयार केले. सीईओ डॉ. राजेंद्र जगताप यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. येथील स्थानिक विकास प्रकल्पांबाबत नागरिकांना त्यांनी माहिती दिली. स्मार्ट सिटीच्या वतीने नजीकच्या काळात होणाऱ्या विकासकामांबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी नगरसेविका स्वप्नांली सायकर, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. ......................निसर्ग संवर्धनाचा संस्कार बीजगोळे करताना मातीत, शेणात हात घालावा लागतो. बी हाताळावी लागते. त्यामुळे निसर्गाशी, पर्यावरणाशी जवळीक निर्माण होते. झाडाशी एक प्रकारचे नाते निर्माण होते. यातून सर्वांवरच संस्कार संवर्धनाचा घडतो. विशेषत: मुलांमध्ये याचा अधिक फायदा पाहायला मिळतो. त्याशिवाय गटामध्ये हा उपक्रम राबवला तर सांघिक भावना जोपासली जाते. ..........................बीजगोळे म्हणजे काय? बीजगोळे म्हणजे सुकलेले शेण व माती यांचा चिखल करून त्यामध्ये बी टाकायचे. त्याचा गोळा करून तो सुकवायचा आणि पावसाळ्यात तो निसर्गात टाकायचा. बीजगोळे तयार करण्यासाठी चिंच, बहावा, आपटा, कांचन, खैर, तामण, बाभूळ, आवळा, पारिजातक, बकुळ अशा स्थानिक झाडांच्याच बिया वापरल्या जातात. ...................बीजगोळ्याचे फायदे नुसत्या बिया टाकल्यास त्याला कीड, बुरशी लागू शकते. तसेच त्या पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाण्याची शक्यता असते. याशिवाय किडे, मुंग्या बिया खाऊ शकतात. त्यामुळे बिया रुजण्याची शक्यता कमी होते. बीजगोळ्यांमुळे बी रुजण्याची प्रमाण वाढते. कारण, मातीमुळे बी संरक्षित होते. तसेच शेणामुळे पोषक घटकही मिळतात. बीजगोळे तयार करण्यासाठी विशेष वेगळी साधने लागत नाहीत. ही पद्धत अगदीच सोपी आणि आनंद देणारीसुद्धा आहे. 

टॅग्स :Puneपुणे