शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

लोकमान्य टिळकांच्या कामाला कोणाची पावती नकोय; खापर पणतू स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 21:51 IST

समाधीसाठी लोकमान्यांनी काय केलं ते सर्वांना माहित्येय; टीकाकारांना कुणाल टिळकांचं उत्तर

पुणे: लोकमान्य टिळक यांच्या कामाला कोणाचीच पावती नको. कोणी ती द्यायचा प्रयत्नही करू नये. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांच्या हृयातीत बांधली गेली नसेल. मात्र समाधी व्हावी यासाठी त्यांनी कायकाय केले ते मराठी जनतेला आजही चांगलेच माहिती आहे, अशा शब्दात लोकमान्यांचे खापर पणतू कुणाल टिळक यांनी समाधीवरून सुरू असलेल्या राजकारणाला उत्तर दिले.औरंगाबादच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडावरील समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असे वक्तव्य केले. त्यावर रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबाबत लोकमान्य टिळकांचा काहीही संबध नाही, तसेच त्यासाठी निधी जमा करून टिळकांनी त्याचा वापरच केला नाही अशी टीका समाजमाध्यमांमधून होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही त्यावर टिळकविरोधी भाष्य केले.कुणाल टिळक लोकमान्य टिळकांचे खापण पणतू आहेत. आमदार मुक्ता टिळक यांचे ते पुत्र असून भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे शहर उपाध्यक्ष आहेत. ते म्हणाले, भाजपाचा म्हणून नाही तर टिळक कुटुंबाचा एक घटक म्हणून मी याचा प्रतिवाद करतो. टीका करणाऱ्यांनी आधी इतिहासाचे वाचन करणाऱ्याला प्राधान्य द्यावे. लोकमान्य टिळकांनीच समाधीसाठी प्रयत्न केले. त्यासाठी निधी जमा केला. काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनीच सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना छत्रपती शिवाजी महाराज हे कसे स्वातंत्ऱ्यांची प्रेरणा आहेत याबद्दल सांगितले. शिवजयंतीला सार्वजनिक स्वरूप दिले ते लोकमान्यांनीच. या सर्वच गोष्टींना पुरावे आहे व टीका करणाऱ्यांनी त्याचा अभ्यास करावा व मगच बोलावे.लोकमान्य टिळकांच्या कामाला कोणाच्या पावतीची गरज नाही, मराठी माणसांच्या मनात टिळकांना कायमच आदराचे स्थान आहे, ते तसेच राहिल, कोणाच्या टिकेने त्याला काहीही धक्का लागणार नाही असे कुणाल म्हणाले.

टॅग्स :Lokmanya Tilakलोकमान्य टिळक