शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानच्या शर्ट काढण्याला मिळतात टाळ्या; रणधीर कपूर यांची ‘पिफ’मध्ये टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 11:58 IST

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत ‘रेट्रोस्पेक्टिव्ह’ (सिंहावलोकन) या विशेष विभागातील ‘शोमॅन’ दिग्दर्शक राज कपूर यांच्या चित्रपट सादरीकरणाला ‘बॉबी’ चित्रपटाने शुक्रवारी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात सुरुवात झाली.

ठळक मुद्देओढणी नव्हती म्हणून  ‘बरसात’ चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट दिले गेले : रणधीर कपूरमगदूम यांनी जुन्या चित्रपटाचा खास फोटो कपूर यांना दिला भेट

पुणे : एक काळ असा होता, की सामाजिक, आर्थिक परिस्थिती तसेच नात्यांची वीण या सर्वांना वेगळे परिमाण होते. जीवनमूल्य कायम होते. समाजाप्रमाणे चित्रपट निघत होते. विषय हा चित्रपटाचा गाभा होता. आजची परिस्थिती बदलली आहे. सलमान आणि करिष्मा कसले कपडे घालतात. सलमानच्या शर्ट काढण्याला टाळ्या पडतात. ओढणी नव्हती म्हणून  ‘बरसात’ चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट दिले गेले. आज तर कपडेच नसतात, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी सध्याच्या चित्रपटांसह खालावत चाललेल्या दर्जावर खरमरीत टीका केली. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत ‘रेट्रोस्पेक्टिव्ह’ (सिंहावलोकन) या विशेष विभागातील ‘शोमॅन’ दिग्दर्शक राज कपूर यांच्या चित्रपट सादरीकरणाला ‘बॉबी’ चित्रपटाने शुक्रवारी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात सुरुवात झाली. त्यापूर्वी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.  अभिनेते राजीव कपूर, महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल व संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम उपस्थित होते. मगदूम यांनी जुन्या चित्रपटाचा खास फोटो कपूर यांना भेट दिला. जुनं ते सोनं आहे, आपण आजही जुनी गाणी ऐकतो आणि सिनेमे पाहतो.  आजचे सिनेमे लक्षात राहत नाहीत, कारण लोकही तसे आहेत. कलेची तुलना करताच येणार नाही. आज वाक्यांवर सिनेमा काढला जातो. गाडी पंक्चर होते आणि सिनेमा निघतो.  सलमान आणि करिष्मा यांच्या ड्रेसला लोक टाळ्या वाजवतात, ही दुर्दैवी गोष्ट असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘राज कपूर यांचे सर्वच सिनेमे उत्तम आहेत. मला बॉबी मास्टर स्ट्रोक वाटतो. तो मी जेव्हा पाहतो तेव्हा १७ वर्षांचा झाल्यासारखे वाटते,’ अशी भावनाही रणधीर कपूर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :PIFFपीफJabbar Patelजब्बार पटेल Puneपुणे