शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
2
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
3
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
4
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
5
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
6
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
7
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
8
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
9
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
10
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
11
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
12
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
13
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू
14
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
15
खेळण्यावरून वाद, अवघ्या १३ वर्षांच्या मुलानं धाकट्या बहिणीचा चिरला गळा
16
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये
17
धक्कादायक! उत्तर प्रदेशातील 'ब्लू ड्रम'नंतर आता उत्तराखंडमध्ये पत्नीने पेट्रोल ओतून पतीला जाळले
18
“उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?”; युती चर्चांवर मनसे नेत्याचा थेट सवाल
19
ट्रम्प टॅरिफचा पहिला धक्का! 'ही' दिग्गज कंपनी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढणार
20
सर्वोच्च न्यायालयाचा अपमान, निशिकांत दुबे अडचणीत; कारवाई होणार? भाजपने हात झटकले...

गुन्हेगारांच्या भांडणात पादचारी सुरक्षारक्षकाचा मृत्यू, फुरसुंगीत गोळीबार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 22:34 IST

दोन गटात सुरू असलेल्या भांडणातून झालेल्या गोळीबारात गोळी लागून रस्त्यावरून पायी जाणा-या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. 

पुणे : दोन गटात सुरू असलेल्या भांडणातून झालेल्या गोळीबारात गोळी लागून रस्त्यावरून पायी जाणा-या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. पंचय्या सिद्धय्या स्वामी (वय ५८, रा़ गंगानगर, फुरसुंगी) असे या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. ही घटना फुरसुंगी गावातील गंगानगर येथे सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबतची माहिती अशी, पंचय्या स्वामी हे एका सहकारी बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. काम संपवून ते घरी जात होते. त्यांच्या घरापासून काही अंतरावर मयुर गुंजाळ व तेजाब कल्याणी यांच्यामध्ये जुन्या वादातून भांडणे सुरू होती. त्यावेळी तेजाबने आपल्याकडील पिस्तुलातून मयुरच्या दिशेने गोळीबार केला. पण गोळी मयुरला न लागता तेथून जाणाऱ्या पंचय्या स्वामी यांच्या मांडीला दोन गोळ्या लागल्या. ते तेथेच खाली पडले. स्वामी यांना गोळी लागल्याचे पाहताच दोघेही पळून गेले. तेथील नागरिकांनी स्वामी यांना रिक्षात घालून हडपसर पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तातडीने त्यांना नोबेल हॉस्पिटलला नेले. परंतु डॉक्टर तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अतिरक्तस्त्रावामुळे स्वामी यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.मयुर गुंजाळ आणि तेजाब कल्याणी हे दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. फुरसुंगीमधील या दोन गटात त्यामुळे तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी तेथील बंदोबस्तात वाढ केली आहे. गुंजाळ आणि कल्याणी याच्या शोधासाठी पोलिसांनी परिसरात झडती घेण्याचे काम सुरू केले आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत. गुन्हेगारीशी कोणताही संबंध नसताना गुन्हेगारांच्या भांडणात एका सुरक्षारक्षकाला मात्र आपला प्राण गमविण्याची पाळी आली.