जारकरवाडी येथील बढेकरमळा परिसरात डोंगराळ भाग असल्याकारणाने त्याचबरोबर या परिसरातून डिंभे धरणाचा उजवा कालवा जात आहे. त्यामुळे या ठिकाणी मोरांना मुबलक चारा व पाणी असल्यामुळे या परिसरात शेकडो मोरांचे वास्तव्य आहेत. या परिसरातील शेतकरी मोरांना त्रास न देता त्यांना या परिसरात मनसोक्त फिरून देत आहे. त्यामुळे मोरांची संख्या वाढत आहे. तालुक्यातील अनेक नागरिक या ठिकाणी मोर पाहण्यासाठी येत असतात. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एक मोर चैतन्य बढेकर यांच्या विहिरीत पडला असल्याची माहिती वनरक्षक सोपान अनासूने यांना मिळाली. तत्काळ त्यांनी येथील ग्रामस्थ चैतन्य बढेकर, यश बढेकर, प्रदीप बढेकर, सुरेश बढेकर, अशोक जाधव यांच्या साहाय्याने विहिरीत उतरून मोराला कोणतीही दुखापत न होता सुस्थितीत बाहेर काढले. त्याची व्यवस्थित पाहणी करून त्याला दुखापत वगैरे नाही याची खात्री करून पुन्हा निसर्गात सोडून दिले आहे. यामुळे मोराला जीवदान मिळाले आहे.
मोराला मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:14 IST