शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील दहा हजार शिक्षकांसाठी ५०० कोेटी रुपयांची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 15:34 IST

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना पुणे जिल्हा सहकारी बँकेद्वारे पाच लाखांचे कॅशक्रेडिट दिले जाणार आहे. शिक्षकांसाठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आली असून, जिल्ह्यातील दहा हजार शिक्षकांना कॅशक्रेडिटचा फायदा मिळू शकणार आहे.

ठळक मुद्देबँकेच्या संचालक मंडळाची अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठकमाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत निर्णय

बारामती : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना पुणे जिल्हा सहकारी बँकेद्वारे पाच लाखांचे कॅशक्रेडिट दिले जाणार आहे. शिक्षकांसाठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आली असून, जिल्ह्यातील दहा हजार शिक्षकांना कॅशक्रेडिटचा फायदा मिळू शकणार आहे.प्राथमिक शिक्षकांना जिल्हा बँकेद्वारे दिल्या जाणाऱ्या पाच लाखांचे कॅशक्रेडिटबाबत निर्णय घेतल्याचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले. जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने २१ जानेवारीला पुण्यामध्ये माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षक परिषदेत प्राथमिक शिक्षकांना पाच लाखांचे कॅशक्रेडिट पुणे जिल्हा बँकेच्या वतीने मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व रमेश थोरात यांनी ही मागणी पूर्ण करू, असा शब्द दिला होता. सोमवारी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.या बैठकीत शिक्षकांच्या मागणीस अनुसरून प्रति शिक्षक पाच लाखांचे कॅशक्रेडिट देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे थोरात यांनी सांगितले. जिल्हा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने अजित पवार व रमेश थोरात यांचा सत्कार केला. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे, सरचिटणीस खंडेराव ढोबळे, राजेंद्र जगताप, ज्ञानेश्वर पुंडे,  सुरेश सातपुते, संतोष पानसरे उपस्थित होते. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारBaramatiबारामती