शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परतफेड! निमगावच्या ग्रामस्थांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पाठवला खंडेरायाचा 'बेलभंडारा' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 20:57 IST

विकासकामांसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे मानले आभार....

दावडी: निमगाव खंडोबा व परिसराच्या विकासासाठी खंडोबा देवस्थान मंदिर रिंगरोड (धामणटेक ते मंदिर, मंदिर ते निमगाव गावठाण ते दावडी व पुन्हा धामणटेक) असा रिंगरोड व रोपवे मार्ग या कामांना केंद्रीय मार्ग निधीतून ५६ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना खंडोबा मंदिरासमोर तळी भरून देवाचा बेल भंडारा कुरीयरने ग्रामस्थांनी दिल्लीला पाठविला आहे.  निमगाव खंडोबा व परिसरात विकास कामांसाठी ५६ कोटी रुपये निधी दिल्याची घोषणा गडकरी यांनी केली. निमगाव चे सुपुत्र IAS  संकेत भोंडवे सध्या गडकरी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत आहे. त्यातून हे मोठे काम मंजूर झाले आहे.

खंडोबा मंदिर पायथ्याशी सुसज्ज असे हेलिपॅड व रेस्ट हाऊस तसेच खंडोबा मंदिर पायथ्याशी रोपवे स्टेशनशेजारी भव्य बगीचा, स्वच्छतागृह, भक्त निवास, वृक्षारोपण त्याचप्रमाणे मंदिर परिसरामध्ये हायमॅक्स लाइट इत्यादी सुविधा करण्यात येणार आहेत.या कामांमुळे खेड तालुक्यातील पर्यटन, औद्योगिक व कृषी क्षेत्रांच्या विकासास  मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. तसेच निमगाव, दावडी, कनेरसर या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. 

खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची होणारी अडचण दूर होऊन भाविकांना सुखसुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. शुक्रवारी (दि. २३) खंडोबा देवस्थान ट्रस्ट, निमगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी एकत्र येत  खंडेरायाची बेल भंडाराने ग्रामस्थांनी तळी भरुन खंडेरायाचा मानाचा प्रसाद म्हणून गडकरींना बेलभंडारा कुरियरने दिल्लीला रवाना करण्यात आला.

ग्रामपंचायत व देवस्थानच्या वतीने आभार पत्र पाठवण्यात आले.यावेळी विजयसिंह शिंदे पाटील, खंडोबा देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष बबनराव शिंदे, राज्य पोलिस पाटील संघटनेचे बाळासाहेब शिंदे, निमगावचे माजी सरपंच बबन शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :KhedखेडNitin Gadkariनितीन गडकरीCentral Governmentकेंद्र सरकारPuneपुणे