शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

पुणे कॅन्टोनमेंट बोर्डास तातडीने एक कोटी रुपये द्या, केंद्र व राज्य सरकारला हायकोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 06:19 IST

कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत, असे सांगण्यात आल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने या बोर्डास तातडीने एक कोटी रुपये द्यावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.

मुंबई  - कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी देशभर नेटाने उपाययोजना केल्या जात असताना पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाकडे हे उपाय तर सोडाच; पण कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत, असे सांगण्यात आल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने या बोर्डास तातडीने एक कोटी रुपये द्यावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.केंद्र सरकारकडून ‘जीएसटी’च्या बदल्यात मिळायची भरपाईची रक्कम वेळेवर न मिळाल्याने कॅन्टोनमेंट बोर्डाची ही स्थिती आली आहे. तातडीची गरज म्हणून पैसे कोणी द्यायचे यावरून केंद्र व राज्य सरकारने जबाबदारी परस्परांवर ढकलण्याची भूमिका घ्यावी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत न्या. एस. जे. काथावाला व न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.पुणे महापालिकेस ‘जीएसटी’ भरपाईचे ५०० कोटी रुपये लगेच दिले जावेत यासाठी तेथील एक नागरिक अतुल विनायक गायकवाड यांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीत हा विषय उपस्थित झाला. कोरोनाचे काही रुग्ण कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीत आढळले. पण तेथे काही सोय नसल्याने या रुग्णांना पुण्यात यावे लागते. कॅन्टोनमेंट बोर्डास ५ मार्च रोजी यासंबंधी पत्रही लिहिले, असे याचिकाकर्त्यांचे वकील श्रीनिवास पटवर्धन यांनी निदर्शनास आणले. यातून मार्ग काढण्यासाठी खंडपीठाने अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी व अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांना मुद्दाम पाचारण केले.बोर्डास नागरी सुविधांसाठी पैसे हवे आहेत, पण म्हणजे काय हे नेमके स्पष्ट नाही. पैसे देता येणार नाहीत, असे अनिल सिंग यांचे म्हणणे होते. अ‍ॅडव्होकेट जनरल म्हणाले की, बोर्डाचे क्षेत्र चहुबाजूंनी पुणे महापालिकेने वेढलेले असल्याने अशा आणिबाणीच्या वेळी राज्य सरकार हद्दीची सबब सांगून बोर्डाच्या हद्दीतील नागरिकांना वाºयावर सोडणार नाही. मात्र उचलून पैसे देण्यापेक्षा पुणे महापालिका कोरोना उपायांसाठी आपली यंत्रणा बोर्डाला उपलब्ध करून देईल, असे त्यांचे म्हणणे होते. बोर्डाचे ज्येष्ठ वकील आर. एस. जहागिरदार यांनी बोर्डाला २.३ कोटी रुपये, कोणत्याही खात्यावर लगेच दिले जावेत. बोर्ड त्याच्या खर्चाचा हिशेब देईल, अशी विनंती केली.शेजाऱ्यांची कणव, आप्त वा-यावरशेजारी देशांवर जेव्हा आपत्ती येते तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी भारत नेहमीच पुढे सरसावतो. पण आता कोरोना या महामारीचे संकट संपूर्ण जगावर आलेले असताना आपल्याच देशातील लोकांना मदत करण्यात केंद्र व राज्य सरकारांनी चालढकल करावी, हे शोभनीय नाही, असे म्हणत खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Courtन्यायालयpune cantonment boardपुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड