शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

‘पैसे द्या, पुरस्कार घ्या’ : सांस्कृतिक क्षेत्रात फुटले पुरस्कारांचे पेव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 13:08 IST

पुरस्कारांसाठी रक्कम लाटण्याची बळावत चाललेली प्रवृत्ती पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीसाठी लाजिरवाणी बाब ठरत आहे.

ठळक मुद्देनवीन उदयास आलेल्या संस्थांनी लोकांकडूनच पैसे घेऊन पुरस्कार वाटण्याचा सपाटा

पुणे : पुरस्काराला पाठीवर कौतुकाची थाप किंवा विशिष्ट क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची पावती समजली जाते. मात्र, जर कुणी विचारलं की तुम्हाला आम्ही पुरस्कार देतो, तुम्ही आम्हाला इतकी रक्कम द्या, तर? आश्चर्य वाटलं ना! पण सध्या सांस्कृतिक क्षेत्रात अशा पद्धतीने पुरस्कार वाटपांचे पेव फुटले आहे. कलावंताला किंवा वाङ्मयीन विश्वातील लेखकाच्या एखाद्या कलाकृतीला पुरस्कार द्यायचा झाल्यास प्रकाशकांकडूनच पुरस्कार देण्यासाठी काही व्यक्ती आणि संस्थांकडून रक्कम लाटली जात असल्याचे समोर आले आहे. कला क्षेत्रातील वंदन नगरकर यांनी ‘पुण्यातील एक जण सारखे पुरस्कार वाटतं फिरत असतो. स्वत:ला तो ‘पुरस्कार सम्राट’ समजतो. त्याला नकार द्या. त्याच्यापासून सावध राहा’ अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर टाकून या प्रवृत्तीवर बोट ठेवले आहे. पुरस्कारांसाठी रक्कम लाटण्याची बळावत चाललेली प्रवृत्ती पुण्यासारख्या सांस्कृतिक नगरीसाठी लाजिरवाणी बाब ठरत आहे. नगरकरांच्या त्या ‘पोस्ट’ने ‘कोण हा पुरस्कार सम्राट’ अशा चर्चांना ऊत आला आहे. एखाद्या संस्थेकडून वर्धापनदिन किंवा मान्यवर व्यक्तीचा स्मृतिदिन अथवा जयंतीदिन याचे औचित्य साधत आपली कार्यबहुलता ज्या क्षेत्राशी संबंधित आहे, त्याच्याशी निगडित व्यक्तींना पुरस्कार दिले जातात. मात्र, नवीन उदयास आलेल्या संस्थांनी लोकांकडूनच पैसे घेऊन पुरस्कार वाटण्याचा सपाटा लावला आहे. एखाद्या कार्यक्रमात फारशा प्रसिद्धी झोतात नसलेल्या; पण मेहनतीने काम करणाºया व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन तुम्हाला पुरस्कार द्यायची इच्छा आहे. मात्र, आमची संस्था फारशी नावाजलेली नाही, आर्थिक भारही फारसा उचलू शकत नाही. तुम्ही जर आमच्या संस्थेला मदत केली तर तुमचे नाव पुरस्कार यादीत टाकले जाईल, अशी बतावणी करून पुरस्काराच्या मानकरी मंडळींकडून रक्कम लाटण्याचे प्रकार सुरू आहेत. या भूलथापांना काही कलाकार मंडळी बळीदेखील पडली आहेत. काव्य संमेलनात कविता सादर करण्यासाठीही कवींकडून पैसे मागितले जातात. मात्र अशा ‘सांस्कृतिक गुन्हेगारां’ना वेळीच लगाम घालण्याची गरज कला आणि साहित्य विश्वातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.....काही व्यक्तींकडून लेखकाला पुरस्कार देण्यासाठी संबंधित प्रकाशन संस्थेकडे पैसे मागितले जात असल्याचा अनुभव काही जवळच्याच मित्रांना आला. हे  ‘सांस्कृतिक गुन्हेगार’ कोण आहेत, हे लक्षात घ्यायला हवेत. पुरस्कार देणाऱ्या संस्था नोंदणीकृत आहेत का, संस्थेचे पदाधिकारी कोण आहेत, याची तपासणी करायला हवी. उगाचच पुरस्कार मिळतात म्हणून प्रतिष्ठित आणि नवोदित मंडळींनीही बळी पडता कामा नये - अनिल कुलकर्णी, प्रकाशक........पुरस्कारांचे पेव फुटले आहे, यात शंकाच नाही. कितीतरी व्यक्ती पैसे देऊन पुरस्काराचा उद्योग करणारी आहेत. अशा प्रकाराच्या माणसांना समाजानेच वाळीत टाकले पाहिजे. गेली २७ वर्षे आम्ही गुणवत्तेवर पुरस्कार देत आहोत. या प्रवृत्तीचा मी निषेध व्यक्त करतो.- अ‍ॅड. प्रमोद आडकर, अध्यक्ष, रंगतसंगत प्रतिष्ठान, एकपात्री कलाकार.........अशा प्रवृत्ती कला क्षेत्रात बळावत चालल्या आहेत, हे शंभर टक्के खरे आहे. आपल्या संस्थेचा पुरस्कार घेण्यासाठी कलाकारांना गळ घातली जाते. काही संस्था अशा आहेत ज्या पैसे घेऊन पुरस्कार देतात तर काही व्यक्तीही अशा आहेत ज्या हे पैसे घ्या आणि आम्हाला पुरस्कार द्या, म्हणून मागे लागतात. यातून त्या पुरस्काराचे मोल काही राहात नाही.- वंदन नगरकर, एकपात्री कलाक

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिक