शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

फुटपाथ भाड्याने, परवानाधारकांचा धंदा : पाच ते सहा हजार भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 03:47 IST

महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरामध्ये तब्बल २८ हजार २४९ पथारी व्यावसायिक असून, यापैकी सुमारे १६ हजार १७४ पथारी व्यावसायिक नोंदणीकृत आहेत.

सुषमा नेहरकर-शिंदे ।पुणे : महापालिकेच्या मालकीचे फुटपाथ चक्क भाड्याने देण्याचे प्रकार शहरात सुरू आहेत. सिंहगड रस्ता, लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्त्यासह शहरातील अन्य लहान-मोठ्या व्यवसाय करणाऱ्या परवानाधारकांकडून फुटपाथची आपली जागा दरमहा ५ ते ६ हजार रुपये भाडे घेऊन अन्य विक्रेत्यांना देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरामध्ये तब्बल २८ हजार २४९ पथारी व्यावसायिक असून, यापैकी सुमारे १६ हजार १७४ पथारी व्यावसायिक नोंदणीकृत आहेत. पहिल्या टप्प्यात ७ हजार पथारी व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे.दुसºया टप्प्यात शिल्लक ९ हजार पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. सध्या शहराच्या अनेक रस्त्यांवर, फुटपाथवर चौका-चौकात अनधिकृत पथारी व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. यामध्ये अनेकांनी महापालिकेचा परवानादेखील घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेला कोणतेही भाडे अथवा कर न भरता पथारीधारक लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादावर राजरोस धंदा सुरू ठेवतात.महापालिका प्रत्येक परिसर, तेथे असलेला व्यवसाय, जागेची मागणी या सर्व गोष्टींचा विचार करून भाड्याचे दर निश्चित केले जातात. यासाठी पथारी व्यावसायिकांची अ, ब, क, ड असे वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे या पथारी व्यावसायिकांना २५ रुपयांपासून ते ३०० रुपये प्रतिदिन असे भाडे आकारले जाते. परंतु शहरातील अनेक रस्त्यांवर फुटपाथच्या जागा काही परवानाधारक पथारी व्यावसायिकांकडून चक्क भाड्याने दुसºया व्यक्तीला दिली जात आहे. यासाठी पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत भाडे घेतले जात आहे.मूळ मालकानेच व्यवसाय केला पाहिजेआपल्या कुटुंबाचे चरितार्थ चालावा, यासाठी महापालिकेकडून गरजू व्यक्तींना लहान-मोठा व्यावसाय करण्यासाठी प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे मूळ मालकानेच धंदा करणे आवश्यक आहे. ज्याला गरज नाही त्याला केवळ भाडे घेण्यासाठी परवाना दिला जात नाही. यामुळे संघटनेच्या वतीने अशा व्यावसायिकांना कधीही पाठीशी घातले जात नाही. असे काही प्रकार संघटनेच्या लक्षात आल्यास महापालिकेला संबंधित व्यावसायिकाचा परवाना रद्द करण्यास सांगण्यात येईल.- बाळासाहेब मोरे,सरचिटणीस, पथारी व्यावसायिक पंचायत

टॅग्स :Puneपुणे