शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पाटसकरांनी रक्तदानातून जोपासली सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:09 IST

पाटस : लोकमत, पाटस ग्रामविकास फाउंडेशन आणि पाटस व्यापारी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला पाटसकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद ...

पाटस : लोकमत, पाटस ग्रामविकास फाउंडेशन आणि पाटस व्यापारी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला पाटसकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात ११३ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. या शिबिराला दौंड येथील रोटरी ब्लड बँकेचे विशेष सहकार्य मिळाले.

शिबिराचे उद्घाटन पाटसच्या सरपंच अवंतिका शितोळे, यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराच्या सुरुवातीला युवा रक्तदात्यांचा प्रतिसाद मिळाला. यावेळी उबेद बागवान, सलमान तांबोळी, तौफिक तांबोळी, आसिफ तांबोळी, आशिष कासवा सोहेल तांबोळी, फुजेल तांबोळी, सुयोग कुलकर्णी, चैतन्य बंदीष्टी, शाहिद बागवान, अपूर्व गदादे, जईद बागवान, जाकीर बागवान या युवा तरुणांनी रक्तदान केले. दरम्यान, किरण व काजल जाधव, जुनेद व आफ्रिन तांबोळी, वशीम व रुक्सार तांबोळी, हर्षद व सोनाली बंदिष्टी, शैलेश व संगीता इंगुलकर, विनोद व राजश्री सोनवणे या सहा दाम्पत्यानी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

पाटस ग्रामविकास फाउंडेशनचे आणि पाटस व्यापारी संस्थाचे विनोद कुरुमकर, जुनेद तांबोळी, हर्षद बंदीष्टी, गणेश जाधव स्वप्निल सोनवणे, राजू गोसावी, नानासाहेब म्हस्के, प्रवीण आव्हाड, प्रमोद कुरुंद, रूपेश रोकडे, शैलेश बारवकर, गणेश शितोळे यांची शिबिरासाठी मोलाची कामगिरी झाली. या व्यतिरिक्त महिला कार्यकर्त्या अपर्णा कुरुमकर, सोनाली बंदीष्टी, निकिता जाधव, सुचिता जठार तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल ढमाले, प्रशांत खरात, बापू सोनवणे, ऑक्सिरेड मिनरल वॉटर यांचे शिबिराला सहकार्य मिळाले.

या शिबिरास उपसरपंच छगन म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक संजय ननागरगोजे, वासुदेव काळे, योगेंद्र शितोळे, सत्त्वशील शितोळे, डॉ. मधुकर आव्हाड, सुभाष रंधवे, तानाजी दिवेकर, मिलिंद दोशी, संभाजी देशमुख, संभाजी खडके, शिवाजी ढमाले, दादा भंडलकर, तृप्ती भंडलकर, माऊली शेळके, महादेव चौधरी, सयाजी मोरे, ॲड. उदय फडतरे, निळकंठ बंदिष्टी, अशोकराव बंदिष्टी, राजू शिंदे, मनोज फडतरे, सुभाष डाबी, गणेश आखाडे, राजू झेंडे, सचिन आव्हाड, डॉ. लाड आदींनी सदिच्छा भेटी दिल्या.

चौकट.....

दौंडच्या बोरावकेनगर येथील रहिवासी व सिप्ला कंपनीतील कामगार किरण जाधव आणि त्यांची पत्नी यांना दौंड येथील लोकमतच्या शिबिरात रक्तदान करायचे होते. मात्र या दिवशी सायंकाळी जोराचा पाऊस सुरू झाल्याने या दाम्पत्याला रक्तदानस्थळी पोहाचता आले नाही, त्यामुळे त्यांचे रक्तदान हुकले. परिणामी पाटस येथील रक्तदान शिबिराची माहिती कळताच जाधव दाम्पत्य त्यांच्या तान्हुल्या बाळाला घेऊन रक्तदानाला आले, यावेळी या दाम्पत्याने रक्तदान केले.

१८ दौंड रक्तदान

रक्तदान शिबिराचे उदघाटन करताना सरपंच अवंतिका शितोळे, पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पाटील आणि इतर.

१८ दौंड रक्तदान १

रक्तदान शिबिर यशस्वी करणारे पाटस ग्रामविकास फाउंडेशनचे आणि पाटस व्यापारी संस्थेचे शिलेदार.