शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
2
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
5
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
6
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
8
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
9
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
10
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
11
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
12
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
13
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
14
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
15
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
16
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
17
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
18
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
19
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
20
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

देशभक्तीचा जागर

By admin | Updated: October 2, 2015 00:52 IST

गुड मॉर्निग, गुड नाइट, नमस्कार, आदाब असे अभिवादनपर शब्द न उच्चारता ‘जयहिंद’ म्हणा.

पिंपरी : गुड मॉर्निग, गुड नाइट, नमस्कार, आदाब असे अभिवादनपर शब्द न उच्चारता ‘जयहिंद’ म्हणा. सर्व जाती-धर्माच्या नागरिकांमध्ये देशभक्ती वाढविण्यासाठी, प्रेम आणि विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी या पद्धतीने अभिवादन करावे, असे आवाहन निवृत्त भारतीय सैनिकांनी केले. देशसुरक्षेसाठी जवानांसोबत नागरिकांची जबाबदारी असल्याचे भान त्यांनी करून दिले. ‘शौर्या तुला वंदितो’ या देशभक्तीचा जागर कार्यक्रमात १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या ५० सैनिक आणि अधिकाऱ्यांचा हृद्य सत्कार सोहळ्यात निवृत्त जवानांनी नागरिकांना संदेश दिला. सह्याद्री प्रतिष्ठान, राष्ट्रीय सैनिक संस्था व मार्शल कॅडेट फोर्स च्या वतीने संत आचार्य अत्रे रंगमंदिरात मोठ्या उत्साहात कार्यक्रम झाला. डोक्यावर केशरी रंगाचा फेटा, छातीवर लावलेली असंख्य लष्करी पदके, चेहऱ्यावर उल्हसित करणारे तेज ७२ ते ९६ वर्षांच्या या निवृत्त जवानांच्या चेहऱ्यावर झळकत होते. मार्शल कॅडेट फोर्सच्या विद्यार्थ्यांनी लष्करी शिस्तीत प्रत्येकाचे स्वागत केले. राजपुताना रायफल बॅँगपाईप बॅण्डपथकाच्या वादनात अमर जवान ज्योतीस मानवंदना दिल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते रौप्यपदक, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन करताना वीरचक्रविजेते निवृत्त कर्नल तेजेंद्रपाल त्यागी म्हणाले, ‘‘कोणी भेटल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने अभिवादन केले जाते. ही पद्धत बदलून सर्वांनी अभिवादन करताना ‘जयहिंद’ म्हणावे. त्यामुळे देशभक्ती वाढीस लागेल. शहिदांचा सन्मान केला गेल्याने राष्ट्र निर्माणास चालना मिळणार आहे.’’ त्यागी, निवृत्त कॅप्टन जयंत सरंजामे आणि निवृत्त ब्रिगेडीअर दिवाकर परांजपे यांनी १९६५ च्या युद्धाची माहिती दिली. कोणत्या परिस्थितीत कामगिरी फत्ते केली याची जाणीव करून दिली. उद्योगमंत्री देसाई म्हणाले, ‘‘पाकिस्तानसोबत तीन युद्धे झाली आहेत. त्यात त्यांना धडा शिकविला, तरीही त्याची वळवळ कायम आहे. या युद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या संख्येपेक्षा अधिक संख्येने छुप्या आणि अतिरेकी हल्ल्यात अधिक सैनिक मारले गेले आहेत. पाकिस्तानचे कंबरडेच मोडण्यासाठी सध्याचे भारतीय सैनिक सक्षम आहेत. पंतप्रधानांनी तशी परवानगी द्यावी. पलीकडील सीमेपर्यंत जाऊन सर्व प्रदेश काबीज करण्याची क्षमता सैनिकांमध्ये आहे. आता आरपारच्या युद्धाची गरज आहे.’’ लष्करामध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. ’’या वेळी निवृत्त एअर कमांडर सुरेंद्र त्यागी, आमदार महेश लांडगे, नितीन बानगुडे, विकास काने, कैलास लबडे, नगरसेवक महेश चांदगुडे, सुजाता पलांडे आदी उपस्थित होते. ओमप्रकाश पेठे यांनी प्रास्ताविक केले. श्रमिक गोजमगुंडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)