शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

पतीराजांची लुडबूड

By admin | Updated: April 3, 2015 03:25 IST

महापालिकेतील स्थायी समिती, विधी, क्रीडा, शिक्षण मंडळ आदी विभागांमध्ये नगरसेविका महिलांसह त्यांचे पतीराजही हजेरी लावतात.

पिंपरी : महापालिकेतील स्थायी समिती, विधी, क्रीडा, शिक्षण मंडळ आदी विभागांमध्ये नगरसेविका महिलांसह त्यांचे पतीराजही हजेरी लावतात. विविध समितींच्या होणाऱ्या बैठकीच्या कक्षाबाहेर असणाऱ्या अँटिचेंबरमध्ये पतीराज बसून कामकाजात लुडबूड करीत असतात. स्थायीच्या बैठकीत कोट्यवधींच्या आर्थिक व्यवहारांचे विषय मंजुरीस येत असतात व मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. कोणत्याही पदावर कार्यरत नसताना पत्नी व अधिकाऱ्यांच्या कक्षातही हे बहाद्दर कामात लुडबूड करताना दिसून येतात. पतीराजांकडे पद नसले, तरीही महापालिकेत आपले वर्चस्व आहे, हे सिद्ध करण्यासाठी या मंडळींची धडपड सुरू असते. असेच चित्र विविध समित्यांच्या कक्षांतही असते. पदाधिकारी तसेच सत्ताधारी पक्षनेत्यांसमवेत अधिकारी कक्षातही त्यांचा वावर असतो. चहापानातही सहभागी असतात. पद नसतानाही महापालिकेत नियमितपणे उपस्थिती लावणे, समितीच्या कार्यालयात हजेरी लावणे, यामागचा त्यांचा हेतू काय? किंवा विविध समित्यांमध्ये होणाऱ्या पतीराजांच्या हस्तक्षेपावर महापालिका प्रशासनाचाही वचक नाही. महिला पदाधिकाऱ्यांच्या पतीराजांकडून होणाऱ्या हस्तक्षेपाबाबत सभापतींचे सभापती किंवा अन्य सदस्य अवाक्षरही काढत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे. आकुर्डी गावठाण, पिंपळे गुरव, भाटनगर, चिंचवडगाव, स्टेशन, थेरगाव, वाकड, पिंपळे निलख, रहाटणी, पिंपळे सौदागर, किवळे, प्राधिकरण, तळवडे, चिखली, पिंपरी कॅम्प, भोसरी, दापोडी, कासारवाडी, काळेवाडी, नेहरूनगर या प्रभागातील नगरसेविकांच्या कारभारात पतीराजांची लुडबूड दिसून येत आहे. महापालिकेतील कामकाज, प्रश्नांना सामोरे कसे जावे, याची माहिती करून देण्यासाठी हे पतीराज लुडबूड करताना दिसून येतात. काही पतीराज तर नियमितपणेही महापालिकेत हजेरी लावताना दिसून येतात, तर काही नगरसेविकांचे पती महापालिकेत न येताही घरूनच महापालिकेतील कारभार चालवितात. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील एक माजी सदस्य पत्नीसमवेत नियमितपणे येतात. देहबोली आणि आविर्भावातून आपणच नगरसेवक असल्याचे ते भासवितात. भोसरी विधानभा मतदारसंघातील स्थायी समितीचे एक माजी सदस्य पत्नीसमवेत येऊन आपणच स्थायीचे सदस्य आहोत, हे भासविण्याचा प्रयत्न करतात. अशाच प्रकारे काही नगरसदस्य, तसेच शिक्षण मंडळ माजी सभापती, काही माजी विरोधी पक्षनेते, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, विविध समित्यांचे माजी सभापती, उपसभापती, सदस्य आपल्या पत्नीच्या कारभारात हस्तक्षेप करताना दिसून येतात.(प्रतिनिधी)