शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात ‘गृह विलगीकरणा’तील रुग्णांना मिळेना मेडीकल कीट; नागरिकांकडून तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 21:13 IST

खासगी रुग्णालयांमधून घ्यावे लागतात औषधे

ठळक मुद्देशहरातील गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 7 हजार 393 झाली

पुणे : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णालयांमधील खाटांची उपलब्धता लक्षात घेऊन लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना  ‘गृह विलगीकरणा’चा पर्याय देण्यात येत असून घरीच राहून उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परंतू, या रुग्णांना पालिकेच्या कोविड केअर सेंटरमधून आवश्यक औषधे उपलब्ध करुन दिली जात असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. नाईलाजास्तव नागरिकांना मेडिकल्स किंवा खासगी रुग्णालयांमधून औषधे खरेदी करावी लागत आहेत.शहरातील गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 7 हजार 393 झाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. एकूण सक्रिय रुग्णांच्या तुलनेत हा आकडा 50 टक्के आहे. पालिकेच्या कोविड सेंटरमधून स्वाब रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर ज्यांच्याकडे घरात राहून उपचार घेणे शक्य आहे अशांना घरीच उपचार घेण्यास परवानगी देण्यात येते. त्याकरिता स्थानिक आरोग्य निरीक्षकांकडून पत्र घ्यावे लागते. स्वाब तपासणी केंद्रावरुन या रुग्णांना घरी पाठविताना मेडीकल कीट देणे आवश्यक आहे. परंतू, अनेक रुग्णांना हे मेडीकल कीट दिले जात नाही. त्यांना फॅमिली डॉक्टरला दाखवून त्यांच्याकडून औषधे घेण्यास किंवा खासगी रुग्णालयातून औषधे घेण्यास सांगितले जात आहे. यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.एकीकडे हे रुग्ण घरीच राहून उपचार घेत असल्याने पालिकेच्या यंत्रणेवरील ताण कमी होत आहे. तरीदेखील काही वैद्यकीय अधिकारी हे कीट देण्यात हात आखडता घेत आहेत. कोविडची औषधे काही ठराविक मेडीकल्समध्येच मिळतात. त्याची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. पालिकेच्या सेंटरमधून औषधांचे कीट न मिळाल्याने या मेडीकल्ससह खासगी रुग्णालयांमधून ही औषधे खरेदी करावी लागत आहेत.=चौकट=सर्व कोविड सेंटर्सवर गृह विलगीकरणात राहणा-या रुग्णांना औषधे पुरविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. व्हिटॅमिन सी, मल्टी व्हिटॅमिनसह आर्सेनिक अल्बम, आवश्यकतेनुसार अ‍ॅन्टीबायोटीक्स आदी औषधांचे कीट दिले जात आहे. एखाद दुस-या ठिकाणी चुकून असा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे. या औषधांच्या कीटचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाmedicineऔषधं