शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

पठ्ठे बापूरावांचे वस्तुनिष्ठ चरित्रलेखन आवश्यक, मान्यवरांची अपेक्षा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 01:51 IST

शाहीर पठ्ठे बापूराव हे क्रांतदर्शी कवी होते. त्यांनी आयुष्यात संत तुकारामांसारखा लढा दिला. मात्र त्यांचे जीवन वास्तवापेक्षा अदभुत वलयाची मांडणी करून समोर आणले आहे.

पुणे - शाहीर पठ्ठे बापूराव हे क्रांतदर्शी कवी होते. त्यांनी आयुष्यात संत तुकारामांसारखा लढा दिला. मात्र त्यांचे जीवन वास्तवापेक्षा अदभुत वलयाची मांडणी करून समोर आणले आहे. शाहीर पठ्ठे बापूराव यांचे वस्तुनिष्ठ चरित्र लिहिले गेले पाहिजे अशी अपेक्षा ‘पठ्ठे बापूराव व्यक्ती आणि वाङमय’ याविषयावर आयोजित चर्चासत्रात मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली.राज्य शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई विद्यापीठाची लोककला अकादमी यांच्या वतीने तसेच ललित कला केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विशेष सहकार्याने शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लोककलांचे अभ्यासक आणि मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमर शेख अध्यासनाचे समन्वयक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, लोकसाहित्याचे अभ्यासक प्रभाकर होवाळ, सोपान खुडे यांनी सहभाग घेतला. या वेळी राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे मिलिंद लेले आणि ललित कला केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. प्रवीण भोळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी भूषविले.सोपानराव खुडे यांनी शाहीर पठ्ठे बापूराव यांचा १८६६ ते १९४५ चा कालखंड उलगडला. ते म्हणाले, समकालीन तमाशा कालावंतांबरोबर शाहीर पठ्ठे बापूराव यांचे मतभेद झाले. समकालीन लोकांवर त्यांनी लावणी / गवळण लिहिली. एक गण रचून कलगी पक्षाचा उल्लेख चांगला पण तुरे याचा वाईट अशा प्रकारचे लेखन त्यांनी केले होते. या गणातून समकालीन तमाशा कलावंतांची नावे कळतात ही त्या लेखनाची जमेची बाजू आहे. आजच्या काळात पठ्ठे बापूरावांचे साहित्य संकलित करण्याची गरज आहे. प्रभाकर होवाळ म्हणाले, शाहीर पठ्ठे बापूराव हे नाव सांस्कृतिक क्षेत्रात अजरामर आहे. तमाशाची मशाल त्यांनी सर्वत्र पेटविली. त्यांची सांस्कृतिक उंची मोठी आहे. पण त्यांना उपेक्षित ठेवले. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे स्वछंदी होते. आज लिहिलेली लावणी आणि मिळालेला पैसा आजच खर्च करायचा असा त्यांचा स्वभाव होता. तमाशा कलावंत त्यांच्या नावाचा जागर करतात. त्यांच्यासारखा शाहीर महाराष्ट्रात दुसरा होणे नाही.डॉ. प्रकाश खांडगे म्हणाले पठ्ठे बापूराव हे क्रांतदर्शी कवी होते. त्यांनी तुकोबासारखा लढा दिला. तुकाराम, पठ्ठे बापूराव व नामदेव ढसाळ यांच्यात समानसूत्र दिसते त्यांनी त्यांचे आत्मकथन काव्यातून मांडले. मी व्युत्पन्न ब्राह्मण घरातले अग्निहोत्र सोडले. वेशीबाहेर गेलो. अस्पृश्यांबरोबर राहिलो, त्यांच्या जगण्याला अर्थ दिला. माझ्या जगण्याला अर्थ मिळाला आणि मी शेवटी अर्थहीन झालो असे ते म्हणायचे. काळ कुठलाही असो काळाच्या कसोटीवर संत, पंत टिकतात आणि त्यांचे वाङ्मय अक्षर होते, त्यातले चिंतन त्रिकालाबाधित आणि सर्वसमावेश असते. लोककलावंतांना त्यांच्या गवळणी पाठ आहेत पण अर्थ माहिती नाही. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे.पुणेकरांना लावले९ सारखा पाढा शोधण्याचे वेडतमाशातील कलगी-तुरा सामन्यात तुरेवाल्यांना कलगी पक्षाकडून शाहीर पठ्ठे बापूरावांनी ९ सारखा पाढा कोणता? असे विचारले. त्यासाठी २४ तास दिले. त्या वेळी पुण्यातले सगळे जण पाढा करायला बसले होते. कुणालाच जमले नाही. मग दुसऱ्या दिवशी उत्तर ऐकण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. तमाशा कलावंत दगडू साळी समोर बसले होते. ते उभे राहून म्हणाले मला येतय उत्तर! ९0 चा पाढा आहे. त्याची बेरीज केली तरी ९ च येते आणि उत्तर सापडले. असा किस्सा सोपान खुडे यांनी सांगितला.अध्यक्षीय भाषणात विश्वनाथ शिंदे म्हणाले, पठ्ठे बापूराव यांचे चरित्र निर्माण होणे गरजेचे आहे. त्यांच्या जीवनाकडे पाहत असताना त्यांचे वास्तव जीवन सांगण्यापेक्षा त्यांच्याभोवती अदभुत वलय निर्माण करून लेखनाची मांडणी केली आहे. त्यांचे वस्तुनिष्ठ चरित्र लिहिले जायला हवे. चर्चासत्रानंतर ‘पंचरंगी पठ्ठे बापूराव’ हा विशेष कार्यक्रम पार पडला.

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिक