शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भारत गौरव यात्रा रेल्वेमध्ये ४० प्रवाशांना विषबाधा, पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या उपचाराची व्यवस्था

By विवेक भुसे | Updated: November 29, 2023 01:03 IST

Pune News: चेन्नई हून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांना विषबाधा झाली असल्याचे वृत्त असून या प्रवाशांच्या औषधोपचारासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर तातडीने व्यवस्था करण्यात आली आहे.

- विवेक भुसेपुणे - चेन्नई हून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव रेल्वेगाडीमध्ये प्रवाशांना विषबाधा झाली असल्याचे वृत्त असून या प्रवाशांच्या औषधोपचारासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर तातडीने व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ससून रुग्णालयात प्रवाशांच्या उपचारासाठी व्यवस्था करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जवळपास ४० प्रवाशांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे.

भारत गौरव यात्रा रेल्वे चेन्नईहून पुण्याकडे येत होती़ रेल्वे गाड्यांमधील पेन्ट्री कार काढून टाकण्यात आल्या असल्या तरी या विशेष गाडीमध्ये खानपान सुविधा देण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या भारत गौरव यात्रा रेल्वेगाडीमध्ये काही प्रवाशांना विषबाधा झाली आहे. त्यामुळे या प्रवाशांवर उपचार करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही विशेष रेल्वे गाडी पुणे रेल्वे स्टेशनला आली. प्लॅटफॉर्मवरच विषबाधा झालेल्यांवर प्राथमिक उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. ससून रुग्णालय प्रशासनाला ४० बेड तयार ठेवण्यास सांगण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधील खानपान सुविधा, पेन्ट्री कार काढून टाकल्याने लोकांना ताजे अन्न मिळत नाही. अनेकदा सकाळचे फुड  पॅकेट हे सायंकाळी, रात्री देण्यात येते. त्यातून  अशा दुर्घटना होण्याची शक्यता आहे. रेल्वेने पुन्हा पेन्ट्रीकार सुरु कराव्यात, असे रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेfood poisoningअन्नातून विषबाधाPuneपुणे