शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवनेरी’ च्या प्रवासी संख्येत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 11:41 IST

मागील दहा वर्षांपासून एसटीच्या सेवेत शिवनेरी ही प्रतिष्ठेची बससेवा आहे...

ठळक मुद्दे पुणे -मुंबई व पुणे-औरंगाबाद या शहरांदरम्यान ही सेवा सुरू प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी दि. ८ जुलै रोजी तिकीट दरामध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंतची कपातव्हेईकल ट्रॅकिंग सिस्टममधून बसचालकांवर लक्षमागील महिन्यात विस्कळीत राहिलेल्या रेल्वेने शिवनेरीला आधार दिला

पुणे : तिकीटदरात कपात केल्यानंतर शिवनेरी बसला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत चालला आहे. ८ जुलैपासून पुणे-मुंबईदरम्यान ६० हजार प्रवाशांची भर पडली आहे. मागील महिन्यात सातत्याने विस्कळीत राहिलेल्या रेल्वेने शिवनेरीला आधार दिला आहे. मागील दहा वर्षांपासून एसटीच्या सेवेत शिवनेरी ही प्रतिष्ठेची बससेवा आहे. पुणे -मुंबई व पुणे-औरंगाबाद या शहरांदरम्यान ही सेवा सुरू आहे. या सेवेकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी दि. ८ जुलै रोजी तिकीट दरामध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंतची कपात केली होती. त्यामुळे पुणे स्टेशन ते दादर व स्वारगेट ते ठाणेदरम्यानचे तिकीट दर ५२० रुपयांवरून ४४० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तर स्वारगेट ते दादर मार्गाचे दर ५४० वरून ४६० तर बोरीवली ते स्वारगेटदरम्यानचे दर ६१५ वरून ५२५ रुपयांपर्यंत खाली आले. हे दर कमी केल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ होत असून मागील वर्षीच्या तुलनेत या कालावधीत सुमारे ६० हजार प्रवासी वाढले आहेत, असा दावा एसटी महामंडळाने केला आहे.  वाढलेले तिकीटदर व ओला- उबेरसारख्या टॅक्सी सेवेशी स्पर्धा यामुळे शिवनेरीच्या प्रवासी संख्येमध्ये मोठी घट झाली होती. सध्या ११८ शिवनेरी बसच्या माध्यमातून सुमारे २७५ फेऱ्या होत असून, शनिवार, रविवार व सोमवारी त्यामध्ये वाढ करण्यात येते. ..........व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टममधून बसचालकांवर लक्षदादर ते पुणे स्टेशन या मार्गावर दर पंधरा मिनिटाला सकाळी ५ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत ही बस धावते. प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी पुणे-मुंबई मार्गावरील फुडमॉलसारख्या थांब्यावर थांबण्याचा वेळ कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टमच्या माध्यमातून बसचालकांवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईpassengerप्रवासी