शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलदरम्यान बीसीसीआयची मोठी कारवाई, सहाय्यक प्रशिक्षकांसह तिघांना पदावरून हटवलं!
2
'बह्मोस' भारताला आणखी मालामाल करणार, हा छोटासा देश चीनशी टक्कर घेणार; होणार 700 मिलियन डॉलरची डील!
3
सुरेश धस-धनंजय मुंडे आज एकत्र दिसणार?; शिरूर कासारमधील सोहळ्याकडे राज्याचं लक्ष
4
राज्यात आता रोबोट करणार मॅनहोलची सफाई, २७ महापालिकांसाठी १०० रोबोट
5
"मी माझी फिल्म बघितली अन्.."; 'सुशीला सुजीत' सिनेमा पाहिल्यावर सोनाली कुलकर्णी काय म्हणाली?
6
जगातील निम्मे सोने असूनही बुडाला देश; अर्थव्यवस्था रुळावर यायला लागले तब्बल १२ वर्षे
7
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला मिळतील १६,६५० रुपये
8
Video - धक्कादायक! चालता बोलता 'तो' खाली कोसळला, सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यूचा संशय
9
टाईम मॅगझीनच्या 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत एकही भारतीय नाही, ट्रम्प-युनूस यांचा समावेश; असं आहे कारण
10
जगभर : युक्रेनच्या स्त्रिया शिवताहेत ‘किकिमोरा वॉरसूट्स’, युद्धातील संघर्ष कथा
11
IPL 2025: हाच खरा 'मॅचविनर'! अवघ्या १२ चेंडूत मिचेल स्टार्कने फिरवला सामना, संघ विजयी
12
बहुतेक लोकांना 'या' लोनबद्दल माहितीच नाही, Personal Loan पेक्षाही स्वस्त आणि EMI चं टेन्शनही नाही
13
बँड, बाजा आणि जेल! लग्न होताच अटक; ४ गुन्हेगारांना पकडण्यासाठी १५३ पोलिसांचा फौजफाटा
14
लेख: ‘रोजगार हमी’चा खर्च तिप्पट; मजुरांना पैसे मिळाले का?
15
भल्यामोठ्या अजगरासह बाथटबमध्ये आंघोळ करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल
16
"मधुबाला शेवटी एकटी पडली, किशोर कुमार यांनी दुर्लक्ष केलं", बहीण मधुर भूषण यांचा खुलासा
17
बाबा रामदेव यांच्या पतंजलीची अदार पूनावाला यांच्या कंपनीसोबत मोठी डिल; नवीन क्षेत्रात उडी
18
रेणुका शहाणेंनी आशुतोष राणांसोबत कधीच काम का नाही केलं? अभिनेत्री स्पष्टच म्हणाली- "ऑफर्स आल्या पण..."
19
गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये बनावट पनीर? इन्फ्लुएन्सरचा दावा; हॉटेलने केली अशी कमेंट
20
"तिच्या अंगाची दुर्गंधी येते"; प्रतिस्पर्ध्याला वापरण्यास सांगितले डीओ; टेनिसमधला अजब प्रकार

Parvati vidhan sabha assembly election result 2024 : भाजपच्या माधुरी मिसाळ यांचा ५० हजाराहून अधिक मतांनी दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 14:53 IST

Parvati vidhan sabha assembly election result 2024 :

Parvati vidhan sabha assembly election result 2024 : पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या विसाव्या फेरीअखेर मिसाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांच्यावर ५४,५१५ मतांची निर्णायक आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.

विसाव्या फेरीचे अंतिम चित्र

  • माधुरी मिसाळ (भाजप): १,१७,७८७ मते
  • अश्विनी कदम (राष्ट्रवादी काँग्रेस): ६३,३७२ मते
  • मिसळ यांची विजयी आघाडी : ५४,५१५ मते 

सलग चौथी टर्म

माधुरी मिसाळ यांनी सलग चौथ्यांदा पर्वती मतदारसंघातून विजय मिळवला आहे. भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात विरोधकांना यंदाही अपयश आले आहे. मिसाळ यांनी मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती, जी प्रत्येक फेरीत वाढत गेली. 

विरोधकांचा पराभव

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांना प्रबळ विरोधक मानले जात होते. मात्र, राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजी आणि बंडखोरीमुळे कदम यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार आबा बागुल यांनीही निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर मतविभाजन झाले, ज्याचा थेट फायदा भाजपला झाला.

पर्वती भाजपसाठी अभेद्य गड

माधुरी मिसाळ यांच्या पर्वतीतील विजयाने भाजपचे या मतदारसंघातील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

यंदा पर्वतीत मंत्रिपद मिळणार पर्वती मतदारसंघांमध्ये चौथ्यांदा माधुरी मिसाळ यांना १ लाख 17 हजार 887 हजार मतदान मिळाले. यामुळे  पर्वतीत मंत्रिमंडळाची वर्दी लागणार  असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये मिसाळ यांनी मंत्रिपद मिळाले असा विश्वास व्यक्त करीत  पक्ष जे ठरवल ते मंत्रिपद घेऊन पर्वतीच्या जनतेच्या विकासासाठी यापुढे अधिक काम करणार असल्याचे सांगितले.

 इथे क्लिक करा > महाराष्ट्र विधानसभा २०२४