शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

महापौर बंगल्यावर सत्ताधारी-विरोधकांची रंगली ‘पार्टी’; उजेडात विरोध अंधारात ‘गळ्यात गळे’  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 11:49 IST

एकीकडे सत्ताधाऱ्यांवर ‘निशाणेबाजी’ करायची आणि दुसरीकडे मात्र गळ्यात गळे घालून एकमेकांना‘प्रेमाचे घास’ भरवायचे..

ठळक मुद्देसुग्रास जेवणाचा बेत, कारण मात्र गुलदस्त्यात

पुणे : महापालिकेतील सत्ताधारी भाजपा आणि विरोधी बाकांवरील राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना, मनसे कोरोना काळात एकमेकांवर राळ उडवित असतानाच दुसरीकडे मात्र, एकत्र पार्ट्या झोडल्या जात आहेत. कॉंग्रेसच्या एका बड्या पदाधिकाऱ्याने बुधवारी महापौर बंगल्यावर आयोजित केलेल्या या पार्टीला सर्व  ‘पार्ट्या’चे पदाधिकारी उपस्थित होते. या पार्टीमागील कारण गुलदस्त्यात आहे.

शहरातील कोरोनाचे संकट गडद होत आहे. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचा ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसाठी संघर्ष सुरु आहे. पालिकेतील पदाधिकारी दिवसा एकमेकांवर आरोपांच्या आणि टीकेच्या फैरी झाडत असताना दुसरीकडे मात्र अंधारात मेजवानीचा बेत करीत आहेत. बुधवारी रात्री महापौर बंगल्यामध्ये झालेल्या सुग्रास जेवणाच्या पार्टीची चर्चा गुरुवारी पालिका वर्तुळात ‘चवी’ने केली जात होती. या पार्टीला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह उपमहापौर सरस्वंती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार, मनसेचे वसंत मोरे यांच्यासह काही नगरसेवकही उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.एकीकडे सत्ताधाऱ्यांवर ‘निशाणेबाजी’ करायची आणि दुसरीकडे मात्र गळ्यात गळे घालून एकमेकांना  ‘प्रेमाचे घास’ भरवायचे यामागील गमक समजत नसल्याचे याच विरोधी पक्षांच्या अन्य नगरसेवक आणि नेत्यांचे म्हणणे आहे. कॉंग्रेसच्या एका पदाधिका-याने दिलेल्या या पार्टीमुळे पालिकेतील राजकीय वातावरणात मात्र  ‘खमंग’ चर्चा झडू लागल्या आहेत. स्थायी समितीने अभय योजना आणण्याचा प्रस्ताव आणल्यानंतर कॉंग्रेसकडून बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन ही योजना धनदांडग्यांसाठी आणल्याचा आरोप करीत विरोध करण्यात आला. त्याच रात्री पार्टीचे आयोजन झाल्याने आणि त्याला सत्ताधारी भाजपाच्या महापौरांपासून अन्य पदाधिका-यांनी हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.    ==== ‘आरपीआय’ पार्टीपासून ‘वंचित’चसत्ताधारी-विरोधकांच्या या पार्टीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) गटनेत्यांना निमंत्रण नव्हते. यासंदर्भात गटनेत्या सुनिता वाडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला या पार्टीचा निरोप नसल्याचे स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेMayorमहापौरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliticsराजकारण